मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL: पहिल्या टी-20 पूर्वी भारतासाठी गुडन्यूज! बुमराह टीम इंडियात परतला

IND vs SL: पहिल्या टी-20 पूर्वी भारतासाठी गुडन्यूज! बुमराह टीम इंडियात परतला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2023 04:30 PM IST

jasprit bumrah in team india vs sri lanka: भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे.

jasprit bumrah in team india vs sri lanka
jasprit bumrah in team india vs sri lanka

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (३ जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे.

मात्र, बुमराह टी-20 मालिकेतून नाही तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे.

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आजपासून टी-20 मालिका सुरु होत आहे. तर १० जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारत-श्रीलंका वनडे मालिका

पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)

दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)

तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम)

बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर

२९ वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर होता. टी-२० विश्वचषकही तो खेळला नव्हता. तेव्हापासून तो रिहॅबसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) होता. पण आता एनसीएने त्याला फिट घोषित केले आहे. आता तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली होती दुखापत

जसप्रीत बुमराहने २५ सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद येथे आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या सामन्यात बुमराहने ५० धावा लुटल्या होत्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला. त्यानंतर त्याची टी-२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली होती. पण शेवटच्या क्षणी त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली, त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर त्याने आता पुनरागमन केले आहे.

WhatsApp channel