Ishan Kishan and Aakash Chopra viral stump mic conversation : यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनसाठी वेस्ट इंडिज दौरा चांगलाच यशस्वी ठरला. तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. तिसर्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून इशानने एमएस धोनी, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन सारख्या खेळाडूंच्या क्लबमध्ये समावेश केला आहे, या खेळाडूंनी एकाच मालिकेत सलग अलग तीन अर्धशतके ठोकली आहेत.
या वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणारा किशन इशान किशन हा नवोदित विकेकीपर आहे. या सामन्यात आकाश चोप्रा कॉमेंट्री करत होता. यावेळी एका प्रसंगी इशानने स्टंपिंगसाठी अपील केले, पण कॉमेंट्रीमध्ये आकाश चोप्रा ऑन-एअर म्हणाला की, ' इशान किशन तु रांचीचा असशील, पण तुझे नाव एमएस धोनी नाही.
एवढ्यात स्टंप माईकमधून इशानचा आवाज आला, 'तो म्हणाला की हो ठीक आहे मग'. इशानच्या आवाजानंतर स्टुडिओमधील इतर कॉमेंटेटर पोट धरून हसायला लागतात. मग यानंतर आकाश चोप्रा सारवासारव करत म्हणतो, "इशान किती गोंडस आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.” या घटनेचा व्हिडिओ स्वतः आकाश चोप्राने शेअर केला आहे.
दरम्यान, इशान किशनने वनडे मालिकेचा प्लेअर ऑद सिरीज आहे. पण या कामगिरीवर तो जास्त खूश नाही. सामन्यानंतर तो म्हणला, की "मी दिलेल्या फिनिशिंगवर मी फारसा खूश नाही. सेट झाल्यानंतर मला मोठी धावसंख्या करायची होती. माझ्या वरिष्ठांनी मला तेच सांगितले होते, मी क्रीजवर राहून ते करायला हवे होते." पुढच्या वेळी मी मैदानात सेट होऊन मोठा स्कोर करेन. "
संबंधित बातम्या