india vs ireland t20 series : टीम इंडियाला या महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने आधीच आपला संघ जाहीर केला होता. आता यजमान आयर्लंडनेही आपला संघ जाहीर केला आहे. पॉल स्टर्लिंग १५ सदस्यीय आयरिश संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताला आयर्लंडविरुद्ध ५ दिवसांत तीन टी-20 सामने (१८, २० आणि २३ ऑगस्ट) खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने डब्लिनमध्ये होणार आहेत.
आयर्लंडच्या संघाने अलिकडच्या वर्षांत कौतुकास्पद कामगिरी केली आहे आणि मोठ्या संघांना चांगली टक्कर दिली आहे. कर्णधार पॉल स्टर्लिंग, माजी कर्णधार अँड्र्यू बालबर्नी आणि हॅरी टेक्टरसारखे स्टार फलंदाज संघात आहेत. स्टर्लिंग आणि बालबर्नीला टी-20 क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, तर टेक्टरने अल्पावधीतच छाप पाडली आहे.
३२ वर्षीय स्टर्लिंगने १२९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३३०७ धावा केल्या आहेत ज्यात १ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टर्लिंग सध्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अँड्र्यू बालबर्नीच्या ९३ टी-20 सामन्यांमध्ये १९६५ धावा आहेत. २३ वर्षीय टेक्टरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.
मार्क अडायर, जोशुआ लिटल, जॉर्ज डॉकरेल, बॅरी मॅकार्थी आणि क्रेग यंग सारखे गोलंदाज आयर्लंडच्या गोलंदाजी युनिटमध्ये आहेत. जिथे मार्क अडायर, जोशुआ लिटल आणि क्रेग यंग यांनी वेगवान गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी लिटिलने चांगला खेळ दाखवला. त्याचवेळी जॉर्ज डॉकरेल आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.
त्याच वेळी, २४ वर्षीय अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने त्याच्या आतापर्यंतच्या T20 कारकिर्दीत छाप पाडली आहे. कॅम्फरने ३९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६०० धावा करण्याव्यतिरिक्त २५ बळी घेतले आहेत. कॅम्फरने नेदरलँड्सविरुद्धच्या T20 विश्वचषक २०२१ च्या सामन्यात सलग ४ चेंडूत ४ विकेट घेतल्या होत्या. अष्टपैलू गॅरेथ डेलेनी, यष्टिरक्षक लॉर्कन टकर, बेन व्हाईट आणि थिओ व्हॅन वूरकोम यांसारख्या आशादायी खेळाडूंनाही चांगली कामगिरी करायला आवडेल.
भारताविरुद्धच्या T20I मालिकेसाठी आयर्लंड संघ:
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकॉम , बेन व्हाइट, क्रेग यंग.
संबंधित बातम्या