मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL: सिराजनं घेतला अफलातून कॅच; पण चर्चा विराटची, Video पाहाच!

IPL: सिराजनं घेतला अफलातून कॅच; पण चर्चा विराटची, Video पाहाच!

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 27, 2022 12:20 PM IST

मोहम्मद सिराजने घेतलेला कॅच पाहून विराट कोहलीची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

विराट कोहली
विराट कोहली (हिंदुस्तान टाइम्स)

IPL 2022 च्या ३९ व्या मॅचमध्ये एक गमतीदार प्रसंग पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. आरसीबीचा कप्तान फाफ डू प्लॅसीसने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराजने असा काही झेल घेतला की तो झेल पाहून आरसीबीचा खेळाडू विराट कोहलीची प्रतिक्रिया समाज माध्यामांवर खूप व्हायरल होत आहे.

आरसीबीसाठी पाचवी ओव्हर टाकायला जोश हेझलवूड आला. समोर होता या टूर्नामेंटमधला सर्वात जबरदस्त फ़ॉर्ममध्ये असलेला फलंदाज जोस बटलर. जोसने आपल्या जबरदस्त अंदाजात खेळीला सुरूवात केलीच होती. मात्र पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जोसने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा मात्र मोहम्मद सिराजनं घेतलेल्या अफलातुन झेलनं बटलरच्या खेळीचा अंत झाला. पण ज्या पद्धतीनं बटलरचा कॅच मोहम्मद सिराजनं घेतला त्याला तोड नव्हती. हा कॅच पकडल्यावर विराट कोहलीचं तोंड ‘आ’ वासलं. आणि नेमकी हीच प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल झालीय. बटलरने आपल्या छोट्याश्या ८ धावांच्या खेळीत एक चौकार लगावला.

राजस्थान रॉयल्सला मोठी धावसंख्या भलेही उभी करता आली नसेल मात्र रियान परागचं नाबाद अर्धशतक आणि संजू सॅमसनची २७ धावांच्या खेळीनं राजस्थान रॉयल्सने १४५ धावा केल्या.

विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप

आरसीबीचा माजी कर्णधार आणि एक प्रमुख फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा धावांसाठी झगडताना पाहायला मिळाला. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएल मोसमात फारशा धावा करताना पाहायला मिळालं नाहीय. कोहली सध्या खराब फॉर्ममधनं जात आहे. धावा करणं तर दूर पण कोहलीला क्रीझवर फार काळ टिकून राहताही येत नाहीय. आरसीबी टीम व्यवस्थापनापुढे विराटच्या फॉर्मची चिंता कायम आहे. फुटवर्कचा बादशहा असणारा विराट कोहलीची सध्याची अवस्था न पाहवणारी आहे. एकेकाळी ज्या धावांच्या राज्यात विराट आपली हुकुमत गाजवायचा त्या धावांनी आज विराटकडे पाठ फिरवली आहे.

WhatsApp channel

विभाग