• टीम निवडा

    आयपीएल २०२३ (IPL 2023) ३१ मार्चपासून सुरू होत असून २८ मे पर्यंत चालणार आहे. यावेळी आयपीएलचा पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्येच होणार आहे. कोरोनानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा देशभरात आयपीएल सामने खेळवले जातील आणि स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरलेले असतील. IPL 2023 च्या वेळापत्रकात अनेक गोष्टी नवीन आहेत, काही नवे ठिकाणंदेखील जोडण्यात आली आहेत. सोबतच संघांनादेखील वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांचा समावेश आहे. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघाना ठेवण्यात आले आहे. आयपीएल २०२३ मध्ये एकूण १८ डबल हेडर सामने होणार आहेत.