r madhavan swimmer son vedant : बॉलिवूड आणि तमिळ सिनेमा स्टार आर. माधवनचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यावर्षी वेदांतने खेलो यूथ इंडिया गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत हे यश मिळवले. वेदांत शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड आहे आणि त्यातच त्याला करिअर करायचे आहे.
वेदांतचे वडील आर माधवन हे त्याच्या यशाचा खूप आनंद घेतात आणि सोशल मीडियावर वेदांतशी संबंधित फोटो आणि अपडेट्स देत असतात. वेदांतचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल आहे. १७ वर्षीय वेदांतच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ खूप पाहिला जात आहे, ज्यामध्ये तो वाळूने भरलेले जड जॅकेट घालून वाळवंटात धावत आहे.
कडक उन्हात ट्रेनिंग झाल्यामुळे तो पूर्णपणे घामाने भिजल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एवढ्या लहान वयात कठोर प्रशिक्षण घेणाऱ्या वेदांतचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आहे.
विशेष म्हणजे, जवळजवळ प्रत्येक स्टार अभिनेत्याची मुले बॉलिवूडच्या दुनियेत म्हणजेच अभिनयात आपले नशीब आजमावतात. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक, धर्मेंद्र यांचा मुलगा सनी-बॉबी आणि मुलगी ईशा अशी अनेक उदाहरणे आहेत. या कारणास्तव अनेकवेळा बॉलिवूड किंवा फिल्मी जगताशी संबंधित लोकांवर घराणेशाहीचे आरोपही केले गेले आहेत, परंतु वेदांत काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेदांतला त्याच्या वडिलांसारखा फिल्मस्टार बनायचे नाही, तर खेळात त्याला त्याचे करिअर करायचे आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहून त्याला खऱ्या जगात नायक बनायचे आहे. आतापर्यंत यात त्याला यशही आले आहे. त्याने आपल्या वयोगटात अनेक राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आहेत.
वेदांतने गेल्या वर्षी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली होती. त्याने गट-अ मध्ये १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. वेदांतने १६:०१.७३ सेकंदाची वेळ नोंदवत २०१७ मधील १६:०६.४३ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. या स्पर्धेत वेदांतने अद्वैत पागेचा पराभव केला होता.
वेदांतला २०१८ मध्ये पहिले मोठे यश मिळाले होते, जेव्हा त्याने थायलंड एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकले. याशिवाय, खेलो इंडिया युथ गेम्स २०२० मध्ये १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्येही त्याने अनेक पदके जिंकली आहेत.
संबंधित बातम्या