मराठी बातम्या  /  क्रीडा  /  इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षाही IPL ची कमाई अधिक, सौरव गांगुलीचा दावा

इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षाही IPL ची कमाई अधिक, सौरव गांगुलीचा दावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 12, 2022 04:01 PM IST

नुकतेच इंडियन प्रीमियर लीगचे १५ वे सीझन पार पडले. या १५ वर्षांमध्ये आयपीएल ही केवळ क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील एक प्रमुख लीग म्हणून उदयास आली आहे.

bcci
bcci

आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी (ipl media rights)  सध्या लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठी होत असलेल्या मीडिया हक्कांच्या लिलावातून बीसीसीआयला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (bcci)  एक मोठा दावा केला आहे. कमाईच्या बाबतीत आयपीएल हे इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा (English Premier League) पुढे असल्याचे (Saurav Ganguly) गांगुलीने म्हटले आहे.

नुकतेच इंडियन प्रीमियर लीगचे १५ वे सीझन पार पडले. या १५ वर्षांमध्ये आयपीएल ही केवळ क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील एक प्रमुख लीग म्हणून उदयास आली आहे. यासोबतच जगभरातील सर्व लीगमध्ये आयपीएलचा दर्जाही मोठा होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी तर आयपीएल कमाईच्या बाबतीत इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा पुढे असल्याचा दावा केला आहे.

या सोबतच, आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात महागडी लीग ठरणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, मी क्रिकेटची प्रगती पाहिली आहे. आम्ही आमच्या सुरुवातीला काही हजार रुपये कमावले. पण आता खेळाडूंमध्ये करोडोंची कमाई करण्याची क्षमता आहे. बीसीसीआय क्रिकेट चाहत्यांच्या जोरावर चालत आहे. चाहत्यांनीच क्रिकेटला बनवले आहे. क्रिकेट खूप मजबूत होत आहे. आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त कमाई केली आहे. क्रिकेटला मिळालेल्या प्रेमामुळेच हा खेळ अधिक भक्कम झाला आहे".

बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत मीडिया हक्कांच्या लिलावातून सुमारे १७ हजार कोटी रुपये कमावले होते. याचा अर्थ बीसीसीआयला मीडिया हक्कांच्या लिलावातून सुमारे ६५ कोटी रुपयांची कमाई होत होती. जगभरातील सर्व लीगमध्ये आयपीएल कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर होती.

पण यावेळी मीडिया हक्कांच्या नव्या लिलावामुळे आयपीएल चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या नॅशनल फुटबॉल लीगच्या एका सामन्यातून १३३ कोटी रुपयांची कमाई होते. मात्र, आता असे मानले जात आहे की, बीसीसीआय एका आयपीएल सामन्याच्या मीडिया राईट्समधून १०० कोटींहून अधिकची कमाई करेल. सध्या इंग्लिश प्रीमियर लीगमधील प्रत्येक सामन्याच्या मीडिया हक्कांमधून ८४ कोटी रुपयांची कमाई होते.

WhatsApp channel