मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : ईडन गार्डनवर यशस्वी जैस्वालचं वादळ, कोहली-मलिंगा ते वॉर्नर-सेहवाग कोण काय म्हणालं? पाहा
yashasvi jaiswal vs kkr
yashasvi jaiswal vs kkr

IPL 2023 : ईडन गार्डनवर यशस्वी जैस्वालचं वादळ, कोहली-मलिंगा ते वॉर्नर-सेहवाग कोण काय म्हणालं? पाहा

12 May 2023, 21:24 ISTRohit Bibhishan Jetnavare

yashasvi jaiswal vs kkr highlights: राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जैस्वालने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याची फलंदाजी पाहून क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा ५६ वा (१२ एप्रिल) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने कोलकात्याचा ९ विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ८ विकेट गमावत १४९ धावा केल्या. विजयासाठी मिळालेले १५० धावांचे लक्ष्य संजू सॅमसनच्या संघाने अवघ्या १३.१ षटकांत एक गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने राजस्थानला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने वेगवान फलंदाजी करताना ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकही झळकावले. त्याची फलंदाजी पाहून क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात केली. यादरम्यान त्याने कोलकात्याच्या सर्व गोलंदाजांना झोडपून काढले. यशस्वीने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकाले. त्याने अवघ्या १३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने ४७ चेंडूत ९८ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ५ षटकार मारले.

या खेळीनंतर वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, लसिथ मलिंगा, सूर्यकुमार यादव, इरफान पठाण, वसीम जाफर यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्या किलर बॅटिंगचे कौतुक केले आहे.

यशस्वी जैस्वाल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

यशस्वी जैस्वालसाठी आयपीएल 2023 आत्तापर्यंत उत्कृष्ट ठरले आहे. या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याने ऑरेंज कॅपसाठी फाफ डू प्लेसिसचे टेन्शन वाढवले ​​आहे. यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत ५७५ धावा केल्या आहेत. तो फाफ डू प्लेसिसच्या एका धावेने मागे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या डू प्लेसिसने ५७६ धावा केल्या आहेत.