मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Tickets : मुंबई इंडिन्सच्या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांना? इथून करा बुक

IPL 2023 Tickets : मुंबई इंडिन्सच्या सामन्याचं सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांना? इथून करा बुक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2023 09:58 PM IST

IPL 2023 Tickets : IPL 2023 चा पहिला सामना ३१ मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यात (CSK VS GG) होणार आहे. आयपीएलचे सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचे आहे, ते जाणून घ्या.

IPL 2023 Tickets
IPL 2023 Tickets

IPL 2023 Match Tickets : इंडियन प्रीमियर लीगचा थरार ३१ मार्चपासून सुरू होत आहे. IPL 2023 च्या पहिल्या दहा सामन्यांसाठी तिकीट (mumbai indians match tickets ipl 2023) विक्री सुरू झाली आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK VS GG) यांच्यात होणार आहे. चाहते या सामन्याची तिकिटे बुक माय शो आणि इनसाइडर ऑनलाइन पोर्टलद्वारे खरेदी करू शकतात. आयपीएलची तिकिटे फक्त ऑनलाइन विकली जाणार आहेत. की IPL 2023 साठी ऑफलाइन तिकिटे विकली जाणार नाहीत, त्यामुळे चाहत्यांना फक्त ऑनलाइन तिकिटे बुक करावी लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल सामन्याची तिकिटे

दिल्ली कॅपिटल्स - या संघाचे होम सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. येथे होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत ८५० रुपयांपासून सुरू होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या म्हणजेच RCB होम मॅचसाठी तिकिटाची किंमत रु. २,२५० पासून सुरू होते. चाहते आरसीबीच्या अधिकृत वेबसाइट किंवा इनसाइडर पोर्टलला भेट देऊन तिकीट बुक करू शकतात.

राजस्थान रॉयल्स - या संघाचे होम सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवले जातील. या मैदानावरील सामन्यांची तिकिटं ८०० रुपयांपासून पासून सुरू होतील. चाहते बुक माय शो किंवा इनसाइडर ऑनलाइन पोर्टलद्वारे तिकिट खरेदी करू शकतात.

मुंबई इंडियन्स - मुंबई इंडियन्सचे होम सामने वानखडे स्टेडियमवर होणार आहेत. या मैदानावरील सामन्यांची तिकिटं ९०० रुपयांपासून सुरू होणार आहेत आणि चाहते बुक माय शोद्वारे ही तिकिटे बुक करू शकतात.

पंजाब किंग्ज - पंजाब किंग्जच्या होम सामन्यांच्या तिकिटांची किंमत ९५० रुपयांपासून सुरू होतील. चाहते पंजाब किंग्जच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा इनसायडर ऑनलाइन पोर्टलवरून या सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकतात.

कोलकाता नाईट रायडर्स - या संघाचे होम सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. या मैदानावरील सामन्यांची तिकिटे ७५० रुपयांपासून सुरू होतील. चाहते बुक माय शोवरून तिकिटे खरेदी करू शकतात.

गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्सचे होम सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. या मैदावरील सामन्यांची तिकिटे ८०० रुपयांपासून सुरू होतील.

चेन्नई सुपर किंग्स - या संघाचे होम सामने चेन्नईच्या एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जातील. CSK च्या होम सामन्यांच्या तिकिटांची किंमत ७५० रुपयांपासून सुरू होते. ही तिकिटे इनसाइडर किंवा बुक माय शोवरुन खरेदी करू शकतात.

लखनौ सुपर जायंट्स - या संघाचे होम सामने लखनौच्या एकाना स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर खेळवले जातील. या मैदाची तिकिटे ७५० रुपयांपासून सुरू होतील आणि चाहते इनसाइडर ऑनलाइन पोर्टलवरून तिकीट खरेदी करू शकतात.

सनरायझर्स हैदराबाद - या संघाचे होम सामने हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील आणि तिकीटाची किंमत ७५१ रुपयांपासून सुरू होईल.

WhatsApp channel