Shubman Gill Instagram Post: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ६ विकेट्स पराभव केला. सलामीवीर शुभमन गिल गुजरातच्या संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात त्याने नाबाद १०४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या विजयानंतर शुभमन गिलने सोशल मीडियावर स्वत:चा शर्टलेट फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
बंगळुरुविरुद्धच्या विजयानंतर शुभमन गिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'थर्स्ट ट्रॅप' असे लिहिले आहे. या फोटोमध्ये शुभमन गिल ऍब्ज दाखवताना दिसत आहे. या फोटोला अवघ्या तीन तासात १० लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले. तर, जवळपास २५ हजार लोकांनी कमेंट केली आहे.
आयपीएल २०२३ मधील ७०व्या सामन्यात गुजरात आणि बंगळुरू एकमेकांशी भिडले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरुच्या संघाने गुजरातसमोर १९८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाने पाच चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरूचा पराभव केला. गुजरातच्या विजयात शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ५२ चेंडूत १०४ धावा केल्या. ज्यात ५ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या