मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 PBKS vs KKR : आज पंजाब-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

IPL 2023 PBKS vs KKR : आज पंजाब-केकेआर भिडणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2023 12:00 PM IST

IPL 2023 PBKS vs KKR Match preview: आयपीएल 2023 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हनसह इतर गोष्टी जाणून घ्या.

IPL 2023 PBKS vs KKR
IPL 2023 PBKS vs KKR

Punjab Kings vs Kolkata Knight Riders Match Details : आयपीएल 2023 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आज (१ एप्रिल) दुपारी ३.३० वाजता मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात दोन्ही संघ आपल्या नवीन कर्णधारासह मैदानात उतरतील. एकीकडे शिखर धवन पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळणार आहे, तर दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा केकेआरचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ एकूण ३० वेळा आमनेसामने आले आहेत.

पीच रिपोर्ट

पंजाब आणि कोलकाता यांच्यातील हा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार असून येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असते. या मैदानावर फलंदाजांना मदत मिळते आणि उच्च धावसंख्येचे सामने होतात. अशा स्थितीत पंजाब आणि कोलकाता यांच्यात होणारा सामना हा हाय स्कोअरिंग सामना ठरू शकतो.

हेड टू हेड

पंजाब आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहता, केकेआरची कामगिरी चांगली राहिली आहे. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या एकूण ३० सामन्यांपैकी केकेआरने २० वेळा विजय मिळवला आहे. आता या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज -

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम कुरन, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, राहुल चहर.

कोलकाता नाईट रायडर्स -

व्यंकटेश अय्यर, नारायण जद्दीसन, नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या