मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहलीची मोठी झेप, तर पर्पल कॅप या भारतीय गोलंदाजाच्या डोक्यावर
ipl 2023
ipl 2023

IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहलीची मोठी झेप, तर पर्पल कॅप या भारतीय गोलंदाजाच्या डोक्यावर

19 May 2023, 16:16 ISTRohit Bibhishan Jetnavare

IPL 2023 Orange Purple Cap : हैदराबादविरुद्ध काल शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने डेव्हॉन कॉनवेला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. किंग कोहलीने आतापर्यंत १३ सामन्यात ५३८ धावा केल्या आहेत.

orange cap purple cap in ipl 2023 : आयपीएल 2023 चा ६५वा सामना RCB आणि हैदराबाद (SRH vs RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉइंट टेबलवर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तसेच, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपमध्ये काय बदल झाले, ते जाणून घेऊया.

ऑरेंज कॅप फाफ डू प्लेसिसच्या डोक्यावर

आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या डोक्यावर सध्या ऑरेंज कॅप सजली आहे. डुप्लेसीने या मोसमात (Latest IPL Cap Holders After SRH vs RCB Match) आतापर्यंत १३ सामन्यांत ७०२ धावा केल्या आहेत. त्याचवेळी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने आता १३ सामन्यात ५७६ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल ५७५ धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे.

तर हैदराबादविरुद्ध काल शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने डेव्हॉन कॉनवेला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. किंग कोहलीने आतापर्यंत १३ सामन्यात ५३८ धावा केल्या आहेत. डेव्हॉन कॉनवे ४९८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

पर्पल कॅप शमीच्या डोक्यावर

पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अव्वल स्थानावर आहे. शमीने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत १३ सामने खेळताना एकूण २३ विकेट घेतल्या आहेत. तसेच,गुजरातचाच राशिद खान २३ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थानचा युजवेंद्र चहल २१ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. पीयूष चावला २० विकेट घेत चौथ्या क्रमांकावर आहे. याचबरोबर वरुण चक्रवर्ती १९ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.