मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: जिओच्या ग्राहकांना फुकटात बघता येणार संपूर्ण आयपीएल, कसे कराल 4K स्ट्रीमिंग?

IPL 2023: जिओच्या ग्राहकांना फुकटात बघता येणार संपूर्ण आयपीएल, कसे कराल 4K स्ट्रीमिंग?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2023 07:48 PM IST

IPL 2023 Live Streaming: जिओच्या ग्राहकांना आयपीएलचा सोळावा हंगाम एकदम फ्रीमध्ये पाहता येणार असल्याची कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे.

IPL 2023
IPL 2023

IPL 2023 live streaming on Jio Cinema: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. जिओच्या ग्राहकांना आयपीएलचा सोळावा हंगाम फ्रीमध्ये पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिओ ग्राहकांना 4K म्हणजेच अल्ट्रा एचडीमध्ये सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. क्रिकेटप्रेमींना आयपीएल पाहण्यासाठी डिज्नी हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.

जीओ सिनेमाने यापूर्वी फुटबॉल विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केले होते. जिओचे ग्राहक वेगवेगळ्या कॅमेरा अँगलमधून फुटबॉल सामने पाहू शकले. येत्या ३१ मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. यापूर्वी जिओने आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. जिओच्या ग्राहकांना आयपीएलचा सोळावा हंगाम एकदम फ्रीमध्ये पाहता येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज जिओने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, जिओच्या ग्राहकांना अल्ट्रा एचडीमध्ये आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.

जिओच्या ग्राहकांना १२ भाषांमध्ये क्रिकेट कॉमेन्ट्री ऐकता येणार आहे. ज्यात इंग्रजी, मराठी, तामिळ, हिंदी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी भाषांसह इत्यादी भाषांचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना आपल्या आवडीची भाषा निवडल्यानंतर त्याच भाषेत संपूर्ण सामना पाहता येणार आहे. एवढेच नव्हेतर, तुमच्या स्क्रीनवरील भाषही तुम्ही निवडलेली असेल. जिओ ग्राहकांना मोबाईल व्यतिरिक्त संगणक आणि टीव्हीवरही सामने पाहता येणार आहे.

WhatsApp channel

विभाग