मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : सुर्यकुमार यादव Jio Cinema चा नवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, सुर्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

IPL 2023 : सुर्यकुमार यादव Jio Cinema चा नवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, सुर्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 14, 2023 07:39 PM IST

suryakumar yadav jio cinema IPL 2023 : आगामी IPL सीझनसाठी Jio Cinema ने सूर्यकुमार यादवला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. याआधी एम एस धोनीचीदेखील अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

suryakumar yadav jio cinema IPL 2023
suryakumar yadav jio cinema IPL 2023

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) आगामी सीझन ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु त्याआधी सध्याचा टी-20 वर्ल्ड नंबर-१ फलंदाज सूर्यकुमार यादवला एक गुड न्यूज मिळाली आहे. डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर Jio Cinema ने Tata IPL च्या आगामी मोसमासाठी सूर्यकुमार यादव याची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की, आगामी आयपीएल सीझनसाठी जिओ सिनेमाशी जोडल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. Jio Cinema जगभरातील क्रीडा चाहत्यांसाठी त्यांच्या प्रझेंटेशमधून क्रांती घडवत आहे.

आगामी आयपीएल हंगामाबाबत जिओ सिनेमाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामन्याचा आनंद लुटणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत केली आहे. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त चाहत्यांना तामिळ, तेलगू, कन्नड आणि भोजपुरीसह १२ भारतीय भाषांमध्ये सामन्याच्या कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.

सुर्या टी-20 चा नंबर वन फलंदाज

सूर्यकुमार यादव हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. सूर्याने त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आणि सध्या तो जागतिक क्रिकेटमधील टी-२० फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो.

मुंबईचा पहिला सामना २ एप्रिलला

गेल्या महिन्यात नागपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्याने कसोटी पदार्पण केले होते. मुंबई इंडियन्सला आगामी आयपीएल हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध २ एप्रिल रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचा आहे.

WhatsApp channel