मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Final CSK vs GT : आयपीएल फायनल पुढे ढकलली, सोमवारी सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

IPL Final CSK vs GT : आयपीएल फायनल पुढे ढकलली, सोमवारी सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 28, 2023 06:31 PM IST

आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता, पण पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. आता सोमवारी (२९ मे) सायंकाळी साडेसातपासून सामना सुरू होईल.

IPL Final CSK vs GT
IPL Final CSK vs GT

Cricket IPL Live Score, CSK vs GT 2023 Final IPL Match Updates : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी (२९ मे) राखीव दिवशी आयपीएल चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आज सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला.

IPL Final CSK vs GT Score update

CSK vs GT Live : पावसामुळे सामना होऊ शकला नाही

अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री ११ वाजता पाऊस थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी सायंकाळी ७:३० वाजल्यापासून राखीव दिवशी खेळला जाईल. 

CSK vs GT Live : ११ पर्यंत वाट पाहणार

समालोचक सायमन डूल यांच्याशी बोलताना पंच नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, "रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा १२:०६ पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही तर उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ."

CSK vs GT Live : पाऊस पुन्हा सुरू

अहमदाबादमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. काही काळ हवामान स्वच्छ झाल्यानंतर, कव्हर्स काढून टाकण्यात आले होते. त्याचबरोबर मैदान आणि खेळपट्टी कोरडे करण्याचे काम सुरू झाले होते. आता पावसाने पुन्हा अडथळा निर्माण केला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. मैदान आणि खेळपट्टी पुन्हा कव्हर्सने झाकण्यात आली आहे.

CSK vs GT Live : पाऊस थांबला

अहमदाबादमध्ये पाऊस थांबला आहे. शेत कोरडे करण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे खेळाडू मैदानात उतरले आहेत. मैदान सुखायला बराच वेळ लागेल. काही षटके कापली जातील असे दिसते.

CSK vs GT Live : पाऊस पुन्हा सुरू

प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. अहमदाबादमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ग्राउंड कोरडे करणारे कर्मचारी स्टँडमध्ये परतले आहेत. आता पुर्वीपेक्षा मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या सामन्याचा राखीव दिवस आहे. पण उद्याही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

CSK vs GT Live : पाऊस थांबला

अहमदाबादमधील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बराच वेळ पावसाने बॅटिंग केल्यानंतर आता प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला असून मैदान कोरडे करण्याचे काम सुरू झाले आहे.

CSK vs GT Live : सामन्यासाठी सोमवारी राखीव दिवस 

अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना ९:३५ वाजता सुरू झाला, तर पूर्ण षटके टाकली जातील. दोन्ही संघ २०-२० षटके खेळतील. तसे न झाल्यास ओव्हर कट करून सामना सुरू होईल. रात्री १२.२६ पर्यंत जर पाच षटकांचा सामना न झाला नाही तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जर सुपर ओव्हर झाली नाही, तर साखळी फेरीत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणार्‍या गुजरात टायटन्सला चॅम्पियन घोषित केले जाईल. 

दरम्यान, आज सामना न झाल्यास सोमवारी (२९ मे) पुन्हा सामना खेळवला जाईल. आयपीएल फायनलसाठी सोमवार राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

CSK vs GT Live : पावसामुळे टॉसला विलंब 

आयपीएल फायनलमध्ये पावसाने अडथळा आणला आहे. पावसामुळे टॉसला विलंब होणार आहे. या मैदानावर गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर-2 खेळला गेला तेव्हाही पावसामुळे सामना उशीराने सुरू झाला होता. 

 नाणेफेक कधी होणार याबाबत सध्या कोणतेही अपडेट मिळालेले नाही.

CSK vs GT Live : थोड्याच वेळात नाणेफेक

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्याला फार कमी वेळ शिल्लक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लवकरच नाणेफेक होणार आहे.

CSK vs GT Live : अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूने रविवारी (२८ मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. एका ट्विटमध्ये रायडूने चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे आभार मानले आहेत. यावेळी आपण आपला निर्णय बदलणार नसल्याचेही रायडूने सांगितले.

CSK vs GT Live : फायनलमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड

चेन्नईचा संघ विक्रमी दहाव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. ते आतापर्यंत चार वेळा चॅम्पियन बनले आहेत.  शेवटच्या तीन अंतिम सामन्यांबद्दल बोलायचे तर चेन्नईने दोनदा (२०१८, २०२१) विजय मिळवला. त्याचवेळी, एकदा (२०१९) त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, गुजरातसाठी ही केवळ दुसरी फायनल आहे. गेल्या वेळी ते चॅम्पियन बनले होते.

CSK vs GT : अहमदाबाद हवामान अपडेट

गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम आयपीएल 2023 च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की २८ मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल. चाहत्यांचीही तशीच अपेक्षा असेल. 

मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

CSK vs GT Live : संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

इम्पॅक्ट प्लेयर - पाथीराणा

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवाटिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद

इम्पॅक्ट प्लेयर - यश दयाल

WhatsApp channel