मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs MI Playing 11 : एलिमिनेटरमध्ये अशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन, लखनौही करणार मोठे बदल, पाहा

LSG vs MI Playing 11 : एलिमिनेटरमध्ये अशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन, लखनौही करणार मोठे बदल, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 24, 2023 03:18 PM IST

LSG vs MI Playing 11 : IPL 2023 चा एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. मुंबईचा संघ मोठ्या बदलांसह सामन्यात उतरू शकतो.

ipl 2023 eliminator mi vs lsg
ipl 2023 eliminator mi vs lsg

IPL 2023 चा एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात आज (२४ मे) खेळला जाईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. मुंबईच्या कॅमरोन ग्रीनने शेवटच्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शानदार शतक झळकावले होते. यानंतर मुंबईच्या बहुतेक फलंदाजांना त्यांची लय सापडली आहे. अशा परिस्थितीत लखनौच्या गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

लखनौ सुपर जायंट्सला मुंबईच्या फलंदाजांना रोखायचे असेल लेगस्पिनर रवी बिश्नोईला मोठी भूमिका बजावावी लागेल.बिष्णोईने या मोसमातील १४ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. लखनौची गोलंदाजी आणि मुंबईच्या फलंदाजीच्या कामगिरीवरच या सामन्याचा विनर ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. रोहित शर्मासोबत ईशान किशन डावाची सुरुवात करेल. तिसऱ्या क्रमांकावर कॅमेरून ग्रीन आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव उतरू शकतो. या सामन्यात तिलक वर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतू शकतो. गेल्या सामन्यात तो इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत होता. निहाल वढेरा आणि टीम डेव्हिड देखील संघात आहेत. पियुष चावला पुन्हा एकदा गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. वेगवान गोलंदाजांमध्ये जेसन बेहरेनडॉर्फसह आकाश मधवाल आणि ख्रिस जॉर्डनवर जबाबदारी असेल.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

इम्पॅक्ट प्लेयर: रमणदीप सिंग, विष्णू विनोद, ट्रिस्टन स्टब्स, हृतिक शोकीन, तिलक वर्मा.

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपर जायंट्सने गेल्या सामन्यात सलामीवीर म्हणून करण शर्माला मैदानात उतरवले होते. तो पुन्हा एकदा क्विंटन डी कॉकसोबत ओपनिंग करताना दिसेल. तिसऱ्या क्रमांकावर प्रेरक मंकड आणि त्यानंतर मार्कस स्टॉइनिसला फलंदाजीला येईल. मधल्या फळीत कर्णधार कृणाल पंड्याला साथ देण्यासाठी निकोलस पूरन आणि आयुष बडोनी असतील.

संघाची गोलंदाजी फळीही सज्ज दिसत आहे. वेगवान गोलंदाजीत मोहसीन खान, यश ठाकूर आणि नवीन उल हक असतील. खेळपट्टी फिरकीला मदत करू शकते. अशा परिस्थितीत रवी बिशोईसोबत कृष्णप्पा गौतम सामना खेळू शकतो. कृणाल पांड्याही फिरकी गोलंदाजी करेल.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.

इम्पॅक्ट प्लेयर: काइल मेयर्स, यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, अमित मिश्रा, दीपक हुडा.

WhatsApp channel