IPL 2023 Prize Money: चेन्नई सुपर किंग्जवर पैशांचा पाऊस; फायनल हरूनही गुजरातला मिळाले 'इतके' कोटी
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Prize Money: चेन्नई सुपर किंग्जवर पैशांचा पाऊस; फायनल हरूनही गुजरातला मिळाले 'इतके' कोटी

IPL 2023 Prize Money: चेन्नई सुपर किंग्जवर पैशांचा पाऊस; फायनल हरूनही गुजरातला मिळाले 'इतके' कोटी

May 30, 2023 02:40 PM IST

IPL 2023 Award Winners List: आयपीएलच्या २०२३ मध्ये गुजरातच्या शुभमन गिलने सर्वाधिक चार बक्षीस जिंकले.

IPL 2023 Prize Money
IPL 2023 Prize Money

TATA IPL: आयपीएल २०२३ च्या विजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांना दोन दिवस वाट पाहावी लागली. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रविवारी (२८ मे २०२३) खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (२९ मे २०२३) खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयानंतर चेन्नईच्या संघावर पैशांचा पाऊस पडला. तर, पराभूत झाल्यानंतर गुजरातच्या संघानेही कोट्यवधी रुपये मिळाले.

आयपीएल २०२३ मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईच्या संघाला २० कोटी रुपयांचा धनादेश मिळाला. तर, हार्दिक पांड्याच्या संघालाही १२.५ कोटी मिळाले. त्यानंतर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला सात कोटी मिळाले. तर, लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यात साडेसहा कोटी जमा झाले.

या हंगामात शुभमन गिलची कामगिरी अतिशय प्रभावी ठरली. त्यानं या हंगामात एकूण चार बक्षीस जिंकली. अशा प्रकारे एकट्या शुभमन गिलला ४० लाख रुपये मिळाले. सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला पाच लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. भारताचं भविष्य असलेल्या युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने एमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार जिंकला.

कोणाला किती पैसे मिळाले?

 

विजेता संघ: चेन्नई सुपर किंग्ज- २० कोटी 

उपविजेता संघ: गुजरात टायटन्स १२ कोटी

एलिमिनेटर विजेता: मुंबई इंडियन्स ७ कोटी

चौथा संघ: लखनौ सुपर जायंट्स- ६.५ कोटी

ऑरेंज कॅप: शुभमन गिल- १० लाख रुपये

पर्पल कॅप: मोहम्मद शामी- १० लाख रुपये

एमर्जिंग प्लेअर: यशस्वी जैस्वाल- १० लाख रुपये

प्लेअर ऑफ द सीजन: शुभमन गिल- १० लाख रुपये

गेम चेंजर ऑफ द सीझन: शुभमम गिल- १० लाख रुपये

सर्वाधिक चौकार: शुभमन गिल- १० लाख रुपये

कॅच ऑफ द सीजन: राशीद खान- १० लाख रुपये

सर्वात लांब षटकार: फाफ डू प्लेसिस- १० लाख रुपये

सामनावीर (फायनल): डेवॉन कॉन्वे ५ लाख रुपये

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग