मराठी बातम्या  /  Sports  /  Ipl 2023 Captain Photoshoot With Trophy Rohit Sharma Not Seen Social Media Reaction Ipl 2023 Match 1 Csk Vs Gt

IPL 2023: आयपीएल ट्रॉफीसोबतच्या फोटोशूटमधून मुंबई इंडियन्सचा कर्णधार गायब, रोहित शर्मा आहे तरी कुठे?

ipl 2023 captain photoshoot with trophy
ipl 2023 captain photoshoot with trophy
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Mar 30, 2023 08:50 PM IST

ipl 2023 captain photoshoot with trophy : आयपीएल २०२३ चा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे, त्याआधी सर्व संघांच्या कर्णधारांनी ट्रॉफीसोबत फोटोशूट केले. मात्र, या दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा गायब होता.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) हंगाम सुरू होण्यास २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि आतापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याचा उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यावेळी आयपीएल हंगामातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ( CSK VS GT IPL 2023) यांच्यात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सीझन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्व संघांच्या कर्णधारांनी ट्रॉफीसोबत फोटोशुट केले. मात्र यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोशूटमधून गायब होता.

रोहित फोटोशुटला का नव्हता?

या फोटोशूटबद्दल बोलायचे झाले तर, सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्करामच्या अनुपस्थितीत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फोटोशुटसाठी आला होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवा कर्णधार नितीश राणा देखील फोटोशूट दरम्यान दिसला.

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार रोहित शर्माने या फोटोशूटमध्ये का नव्हता? हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

आयपीएल २०२२ मध्ये खराब कामगिरी

त्याचवेळी, संघाला आगामी मोसमातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २ एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचा आहे. आयपीएलच्या याआधीच्या हंगामातील मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबईने १४ सामन्यात केवळ ४ विजय मिळवले होते. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला या मोसमात सर्व चाहत्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या