मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : देखो वो आ गया! सीएसकेचा सर्वात धोकादायक खेळाडू भारतात पोहोचला, एन्ट्री तर बघा

IPL 2023 : देखो वो आ गया! सीएसकेचा सर्वात धोकादायक खेळाडू भारतात पोहोचला, एन्ट्री तर बघा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2023 07:28 PM IST

Ben Stokes IPL 2023 CSK : चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज बेन स्टोक्स (ben stokes reached india) भारतात पोहोचला आहे. सीएसकेने व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

csk ipl 2023 ben stokes
csk ipl 2023 ben stokes

Ben Stokes IPL 2023 Chennai Super Kings : आयपीएलचा थरार (IPL 2023) ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK VS GG) यांच्यात होणार आहे. गेल्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब होती. मात्र यावेळी संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. अनेक नवीन खेळाडू संघात सामील झाले आहेत. यावेळी संघाने बेन स्टोक्सला संधी दिली आहे. स्टोक्स हा एक मजबूत अष्टपैलू खेळाडू आहे. तो आयपीएल २०२३ साठी संघात सामील झाला आहे. चेन्नईने एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

चेन्नईने आयपीएल २०२३ च्या (IPL 2023 MINI AUCTION ) लिलावात बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. स्टोक्स आधी राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. स्टोक्स भक्कम फलंदाजीसह गोलंदाजी करण्यातही माहीर आहे. त्यामुळे संघावा आणि चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

स्टोक्स भारतात पोहोचला असून तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला आहे. टीमने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये तो कारमधून उतरून हॉटेलमध्ये एठ्री करताना दिसत आहे. ट्विटरवर स्टोक्सचा हा व्हिडिओ २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. या व्हिडिओला १४ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

स्टोक्सने आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये धोकादायक कामगिरी केली आहे. त्याने २०१७ मध्ये आयीपएल पदार्पण केले. स्टोक्सने आतापर्यंत ४२ डावात ९२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. स्टोक्सची सर्वोत्तम धावसंख्या १०७ धावा आहे. त्याने ३७ डावात २८ विकेट्सही घेतल्या आहेत. स्टोक्सची सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ३ बळी अशी आहे.

WhatsApp channel