मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arijit Singh - Dhoni : अरिजित सिंग धोनीच्या पाया का पडला? फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय
Arijit Singh - Dhoni
Arijit Singh - Dhoni

Arijit Singh - Dhoni : अरिजित सिंग धोनीच्या पाया का पडला? फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

01 April 2023, 12:24 ISTRohit Bibhishan Jetnavare

Arijit Singh Touches MS Dhoni Feet In IPL Opening Ceremony : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात धोनीच्या सीएसकेचा पराभव झाला. मात्र, या सामन्यानंतर धोनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. गायक अरिजित सिंग धोनीच्या पाया पडला. या प्रसंगाचा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे.

Arijit Singh Touches MS Dhoni Feet : एमएस धोनी जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. अनेक स्टार सेलिब्रेटी धोनीचे फॅन आहे. धोनीच्या फॅन्समध्ये गुणी गायक अरिजित सिंगचा देखील समावेश आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी (३१ मार्च) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यातील एक फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अरिजित धोनीच्या पाया पडताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खरं तर, उद्घाटन समारंभात अरिजितने त्याच्या हिट गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांनी देखील हिट गाण्यांवर डान्स सादर केला.

अरिजिने केले धोनीचे चरणस्पर्श

या शानदार परफॉर्मन्सनंतर तिघेही ट्रॉफीच्या अनावरणासाठी मंचावर उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना स्टेजवर बोलावण्यात आले. प्रथम चेन्नईचा कर्णधार धोनी स्टेजवर पोहोचला. अरिजितजवळ पोहोचताच अरिजितने वाकून धोनीचे चरण स्पर्श केले. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

यावेळी धोनीने लगेच अरिजितला वर उचलून मिठी मारली. रश्मिका आणि तमन्ना याही धोनीच्या मोठ्या चाहत्या आहेत आणि उद्घाटन समारंभाच्या आधी दोघींनी धोनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अरिजितने असे का केले?

धोनीने जगभरात चाहते आहेत. तो एक ब्रँड म्हणून उदयास आला आहे. त्याने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी अरिजितने त्याचे चरणस्पर्ध केले, असे बोलले जात आहे.

धोनीच्या सीएसकेचा पराभव

दरम्यान, या सामन्यात धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्सने सीएसकेचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ७ गडी गमावून १७८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने १९.२ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.