मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL: रियान परागचा अनोखा विक्रम; दिग्गज क्रिकेटपटूंच्या रांगेत स्थान

IPL: रियान परागचा अनोखा विक्रम; दिग्गज क्रिकेटपटूंच्या रांगेत स्थान

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 27, 2022 11:33 AM IST

सामन्यात अर्धशतक आणि ४ झेल घेत रियान पराग बनला पहिला भारतीय खेळाडू.

रियान पराग
रियान पराग (हिंदुस्तान टाइम्स)

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक सामना खेळला गेला. रियान पराग या मॅचचा हिरो बनला आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यानं पटकावला. रियान परागने ३१ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली आणि क्षेत्ररक्षण करताना त्यानं ४ झेलही टिपले. यासोबतच रियान परागने आपल्या नावावर एक वेगळा रॅकॉर्डही केला. रियान परागने एकाच सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ४ झेल टिपून अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू असा विक्रम आपल्या नावावर केला. असा विक्रम करणारा रियान फक्त तिसरा खेळाडू ठरला आहे.

यापुर्वी आयपीएलमध्ये जॅक कॅलिसनं हा विक्रम आपल्या नावे सर्वप्रथम केला होता. जगातला सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून जॅक कॅलिस परिचित होता. साल २०११ मध्ये जॅक कॅलिसनं डेक्कन चार्जर्स विरुद्ध खेळताना कॅलिसनं अशी कामगिरी केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच साल २०१२ मध्ये जगातल्या सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टनं तेव्हाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणाऱ्या गिलख्रिस्टनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा रियान आयपीएलमधला तिसरा तर भारतीय खेळाडूंमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.

या सामन्यात रियान परागने विराट कोहली, शाहबाज नदीम, सुयश प्रभुदेसाई आणि हर्षल पटेल यांचे झेल पकडले. त्यााधी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या निर्धारित २० षटकात ८ विकेट गमावत १४४ धावा केल्या. ज्यात रियान परागने नाबाद अर्धशतकीय पारी खेळली. रियानशिवाय सामन्यात राजस्थानच्या वतीनं संजू सॅमसनने २७ धावांचं योगदान दिलं. आरसीबीची टीम फक्त ११५ धावात गारद झाली. या विजयानं राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आले आहेत. दोन्ही संघांचे मिळून १२ गुण झाले आहेत. मात्र असं असलं तरी नेट रनरेटच्या बाबतीत राजस्थान काकणभर सरस आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग