मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्सकडून आरसीबीचा धुव्वा, ५४ धावांनी दमदार विजय

RCB vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्सकडून आरसीबीचा धुव्वा, ५४ धावांनी दमदार विजय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 13, 2022 11:56 PM IST

पंजाब किंग्स (PBKS) ने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (RCB) चा ५४ धावांनी धुव्वा उडवला.पंजाब किंग्सचा १२ सामन्यातील हा सहावा विजय असून प्लेऑफमधील आशा अजून जिंवत आहेत.

पंजाब किंग्सकडून आरसीबीचा धुव्वा
पंजाब किंग्सकडून आरसीबीचा धुव्वा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स (PBKS) ने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (RCB) चा ५४ धावांनी धुव्वा उडवला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने दिलेल्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी ९ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारू शकली. पंजाब किंग्सचा १२ सामन्यातील हा सहावा विजय असून प्लेऑफमधील आशा अजून जिंवत आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा डाव  (१५५/९)

२१० धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. ४० धावांतच बंगळुरूने तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करून आरसीबीचे सामन्यातील आव्हान जिंवत ठेवले. मॅक्सवेलने सर्वाधिक ३५ तर रजत पाटीदारने २६ धावांचे योगदान दिले. दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक तीन तर राहुल चाहर आणि ऋषि धवन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. 

पहिला विकेट- विराट कोहली २० धावा, (३३/१)
दूसरी विकेट- फाफ डु प्लेसिस १० धावा, (३४/२)
तिसरी विकेट- महिपाल लोमरोर ६ धावा, (४०/३)
चौथी विकेट- रजत पाटीदार २६ धावा, (१०४/४)
पाचवी विकेट- ग्लेन मॅक्सवेल ३५ धावा, (१०४/५)
सहावी विकेट- दिनेश कार्तिक ११ धावा, (१२०/६)
सातवी विकेट- शाहबाज अहमद ९ धावा, (१२४/७)
आठवी विकेट- वानिंदु हसारंगा १ धाव, (१३७/८)
नववी विकेट- हर्षल पटेल ११ धावा, (१४२/९)

पंजाब किंग्सचा डाव (२०९/९)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सला शिखर धवन (२१ धावा) आणि जॉनी बेयरस्टो ने ६० धावांची मजबूत सलामी भागीदारी करून दिली. बेयरस्टोने २९ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्यामध्ये ७ षटकार व तीन चौकार सामील आहेत. त्यानंतर लियाम लिविंगस्टोनने ४२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७० धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून हर्षल पटेलने ४ तर वानिंदु हसरंगाने २ विकेट घेतल्या

पहिली विकेट- शिखर धवन २१ धावा, (६०/१)
दूसरी विकेट- भानुका राजपक्षे १ धाव, (८५/२)
तिसरा विकेट- जॉनी बेयरस्टो ६६ धावा, (१०१/३)
चौथी विकेट- मयंक अग्रवाल १९ धावा, (१५२/४)
पाचवी विकेट- जितेश शर्मा ९ धावा, (१६४/५)
सहावी विकेट- हरप्रीत बराड ७ धावा, (१७३/६)
सातवी विकेट- लियाम लिविंगस्टोन ७० धावा, (२०६/७)
आठवी विकेट- ऋषि धवन ७ धावा, (२०७/८)
नववी विकेट- राहुल चाहर २ धावा, (२०९/९)

WhatsApp channel

विभाग