मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर ‘टॉप थ्री’मध्ये, पर्पल कॅपसाठी चहलला धोका
डेव्हिड वॉर्नर
डेव्हिड वॉर्नर
13 May 2022, 3:40 PM ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
13 May 2022, 3:40 PM IST
  • यंदाच्या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या आतापर्यंत १० सामन्यांत ६१ च्या सरासरीने ४२७ धावा झाल्या आहेत. वॉर्नरच्या आधी या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर राजस्थानच्या जोस बटलरचा आणि दुसऱ्या क्रमांकावर लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल यांचा नंबर लागतो.

आयपीएलचं १५ वे (IPL 2022) सीझन सुरु आहे. या स्पर्धेतील ऑरेंज कॅपच्या (orange cap) शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता टॉप तीनमध्ये पोहोचला आहे. त्याने बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद ५२ धावांची खेळी केली. या खेळीनंतर त्याने फाफ डु-प्लेसिस, शिखर धवन आणि शुभमन गिल यांना मागे टाकले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

यंदाच्या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या आतापर्यंत १० सामन्यांत ६१ च्या सरासरीने ४२७ धावा झाल्या आहेत. वॉर्नरच्या आधी या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर राजस्थानच्या जोस बटलरचा आणि दुसऱ्या क्रमांकावर लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल यांचा नंबर लागतो. बटलरने आतापर्यंत ६२५ तर राहुलने ४५९ धावा कुटल्या आहेत.  दोघांनीही आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. चौथ्या क्रमांकावर बंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसिस असून त्याने १२ सामन्यात ३८९ धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा शुभमन गिल आहे, त्याने १२ सामन्यात ३८४ धावा केल्या आहेत. 

दरम्यान, जोस बटलर विराट कोहलीचा एका मोसमात सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम मोडेल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच गेले तीन सामने बटलरची बॅट शांत असून त्याला त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे.  विराट कोहलीने २०१६ मध्ये एकाच आयपीएल सीझनमध्ये ९७३ धावा ठोकल्या होत्या.

यासोबतच,  पर्पल कपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. चहलच्या खात्यात १२ सामन्यांमध्ये २३ बळी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वनिंदू हसरंगा असून त्याने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये २१ बळी मिळवले आहेत. हसरंगा चहलला मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, या दोघांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत १२ सामन्यांत १८ बळीसंह तिसऱ्या स्थानी कुलदीप यादव, चौथ्या क्रमांकावर कागिसो रबाडा (१० सामन्यांत १८ बळी) तर पाचव्या क्रमांकावर टी नटराजन विराजमान आहे. नटराजनने ९ सामन्यात १७ बळी मिळवले आहेत. तसेच, गुणतालिकेत गुजरात टायटन्स १८ अंकांसह पहिल्या क्रमांकावर असून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघही ठरला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग