मराठी बातम्या  /  क्रीडा  /  राजस्थान ४ वर्षानंतर प्लेऑफमध्ये.. चेन्नईवर ५ विकेट्सने मात, आता सामना गुजरातशी

राजस्थान ४ वर्षानंतर प्लेऑफमध्ये.. चेन्नईवर ५ विकेट्सने मात, आता सामना गुजरातशी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 20, 2022 11:39 PM IST

राजस्थान रॉयल्स (RR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मधीलप्लेऑफमध्ये दाखल होणारी तिसरी टीम ठरली आहे.गुजरात टाइटन्स (GT)आणि लखनौ सुपर जायन्टस यापूर्वीत(LSG) प्लेऑफफेरीसाठी पात्र ठरले आहेत.

राजस्थान ४ वर्षानंतर प्लेऑफमध्ये
राजस्थान ४ वर्षानंतर प्लेऑफमध्ये

IPL १५  च्या ६८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने हरवले. या विजयाबरोबरच राजस्थान संघाने तब्बल चार वर्षानंतर प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. २०१८ मध्ये संघ शेवटचा प्लेऑफ सामना खेळला आहे. आजच्या सामन्यात आर. अश्विनने राजस्थानसाठी मॅच विनिंग खेळी केली. त्याने केवळ २३ चेंडूत ३ षटकार व २ चौकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ४४ चेंडूत ५९ धावा करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने ८ चौकार व एक षटकार ठोकला. 

राजस्थान रॉयल्स (RR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मधील प्लेऑफमध्ये दाखल होणारी तिसरी टीम ठरली आहे. गुजरात टाइटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायन्टस यापूर्वीत (LSG) प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. 

धोनीची संथ खेळी -

CSK चा कर्णधार धोनीने या सामन्यात खूप संथ फलंदाजी केली. धोनीने २८ चेंडू खेळून केवळ २६ धावा केल्या. सुरुवातीला वाटत होते चेन्नई २०० चा आकडा सहज पार करेल. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नईच्या ठराविक अंतराने विकेट जात राहिल्या. अंबाती रायडू आणि जगदीशन आज अपयशी ठरले. आजच्या सामन्यात धोनीकडून खूप अपेक्षा होत्या मात्र धोनीने २८ चेंडू खेळून १ चौकार व १ षटकार मारून २६ धावांचे योगदान दिले. 

मोईन अलीची वादळी खेळी -

चेन्नई सुपर किंग्ससाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या मोइन अलीने ज झंझावाती खेळी केली. त्याने प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चौथ्या षटकात ३ चौकार व एक षटकार मारून १८ धावा टोकल्या. त्याचबरोबर पाचव्या षटकात मोइन अलीने अश्विनला दोन चौकार व एक षटकार मारला. 

त्यानंतर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोइन अली तुटून पडला त्याच्या षटकात मोईन अलीने ५ खणखणीत चौकार व एका षटकाराच्या मदतीने २६ धावा वसूल केल्या. मोईन अलीने केवळ १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ही दुसरी सर्वात जलद फिफ्टी आहे. 

चेन्नईचा डाव -

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. पण कर्णधाराचा निर्णय सलामीवीरांनी साफ चुकीचा ठरवला. सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही १६ धावा करून बाद झाला. मोईने अलीने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु केली. पण त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. केवळ धोनीने २६ धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. त्यामुळे मोईन अलीच्या ९३ धावांच्या जोरावर चेन्नई १५० धावातच गुंडाळली. राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ४ षटकात २० धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर चहलनेही दोन तर आश्विन आणि बोल्टने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

WhatsApp channel

विभाग