मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsIRE: उमरान मलिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, भुवीने दिली कॅप
umran malik
umran malik
26 June 2022, 20:55 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 20:55 IST
  • टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यातून भारताचा तुफानी गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यातून भारताचा तुफानी गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या हस्ते त्याला टी-२० कॅप देण्यात आली. T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताकडून ९८ वा खेळाडू आहे. उमरान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघातही होता, पण त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

भारताने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेक जिंकला आहे.

आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीचे बक्षीस-

२२ वर्षीय तरुण वेगवान गोलंदाजाचा अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I साठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. उमरानने आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या या दमदार कामगिरीचेच त्याला बक्षीस मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या १५ व्या मोसमात २२ विकेट घेतल्या होत्या.

जम्मू-काश्मीरचा दुसरा क्रिकेटपटू-

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा उमरान हा जम्मू-काश्मीरचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी परवेझ रसूलने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. रसूलने भारताकडून बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी दीपक हुड्डावर विश्वास दाखवण्यात आला आहे. याशिवाय मनगटाच्या दुखापतीतून सावरलेला सुर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाले आहे.

टीम इंडिया-

ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक