मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार?

INDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 21, 2022 06:34 PM IST

भारताचा एक (team india) संघ रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात १ जुलै ते ५ जुलै दरम्यान कसोटी सामना खेळणार आहे. त्याचवेळी, ७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे.

hardik pandya
hardik pandya

टीम इंडिया या महिन्यात आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टी-२० स्पेशलीस्ट संघ आयर्लंडला जाणार आहे. हार्दिक प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे याच काळात भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त असणार आहे.

एकमेव कसोटी सामन्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर भारताला तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप झालेली नाही.

दरम्यान, त्याबाबतच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात जो संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, त्याच संघाला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही खेळण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भारताचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात १ जुलै ते ५ जुलै दरम्यान कसोटी सामना खेळणार आहे. त्याच वेळी, ७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत इतक्या लवकर कसोटीतून टी-२० मध्ये स्विच करणे कसोटी संघासाठी सोपे नसेल. त्यामुळे ज्या संघाची आयर्लंड मालिकेसाठी निवड झाली आहे, तोच संघ इंग्लंडसोबत टी-२० मालिका खेळू शकतो.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, रुतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल, रविंद्र चहल .

WhatsApp channel

संबंधित बातम्या