मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: आता ‘हे’ अति होतंय; रिषभ पंत सुधारणार तरी कधी, टीम इंडिया पराभूत होऊ शकते
rishabh pant
rishabh pant
26 June 2022, 18:07 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 18:07 IST
  • रिषभ पंतने (rishabh pant) नियम मोडून चाहत्यांमध्ये सेल्फी घेतली. त्याची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली, पण पंतला कोरोनाची लागण झाल्यास भारतीय संघ (team india) अडचणीत येऊ शकतो.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील (india vs england) कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली (virat kohli) यांच्यानंतर रोहित शर्मालाही (rohit sharma) कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता एकमेव कसोटीत त्याचे खेळणे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. असे असूनही भारतीय खेळाडू अजूनही सतर्क नसल्याचे दिसून येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आता रिषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांमध्ये सेल्फी घेत आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये मास्कशिवाय फिरताना आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसले होते.

सराव सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी पंतला ऑटोग्राफऐवजी आपल्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. तेव्हा ब्रॉडकास्टरने सांगितले की, भारतीय खेळाडू प्रेक्षकांमध्ये जाणार नाहीत. यासोबतच कोणताही खेळाडू ऑटोग्राफही देणार नाही. पण पंतने हा नियम मोडला. तो चाहत्यांमध्ये गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी देखिल काढला आहे.

रिषभ पंतने फोटो काढल्यानंतर सर्व चाहते खूप आनंदी दिसले. मात्र, पंतची ही बेफिकीर वृत्ती टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. कर्णधार रोहितनंतर पंतसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. या कारणास्तव भारतीय खेळाडूंना चाहत्यांसोबत फोटो घेणे आणि ऑटोग्राफ देणे टाळण्यास सांगितले होते, परंतु पंतने या नियमाकडे दुर्लक्ष केले आणि प्रेक्षकांमध्ये सेल्फी घेतला.

कर्णधाप पदासाठी रिषभ पंतच्या नावाची चर्चा-

रिषभ पंत हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाचा दावेदार आहे. जर कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे कसोटी सामना खेळू शकला नाही तर रिषभ पंतला कर्णधार बनवता येईल. अशात त्याला काही झाले तर भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. त्यानंतर विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह यांना कर्णधारपद भूषवण्याची जबाबदारी येऊ शकते.

कोरोनामुळेच सामना पुढे ढकलण्यात आला होता-

१ जुलैपासून होणारा कसोटी सामना हा यापूर्वी २०२१ मध्ये होणार होता, परंतु त्यावेळी इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. जर इतर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.