Robin Uthappa Retirement : रॉबिन उथप्पानं घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Robin Uthappa Retirement : रॉबिन उथप्पानं घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का

Robin Uthappa Retirement : रॉबिन उथप्पानं घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का

Published Sep 14, 2022 08:06 PM IST

Robin Uthappa Retirement : सलामीला येऊन भारताला अनेक सामने एकहाती जिंकून देणाऱ्या रॉबिन उथप्पानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

<p>Robin Uthappa Retirement In International Cricket</p>
<p>Robin Uthappa Retirement In International Cricket</p> (HT)

Robin Uthappa Retirement In International Cricket : भारताचा स्टार सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पानं आंतरराष्ट्रीय स्तरासह सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृ्त्ती जाहीर केली आहे. त्यानं ट्विटरवरून एक पोस्ट शेयर करत ही घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पानं आपल्या वेगळ्याच फलंदाजीच्या शैलीनं भारतासाठी अनेक सामने एकहाती जिंकलेले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्यानं चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना खोऱ्यानं धावा काढलेल्या आहे. त्यामुळं आता तो क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नसल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ट्विटरवरून निवृत्तीची घोषणा करताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटमध्ये देशाचं आणि कर्नाटक राज्याचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. परंतु चांगल्या गोष्टींचा अंत व्हायला हवा. मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मला साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असं रॉबिन म्हणाला.

रॉबिन उथप्पानं त्याच्या क्रिकेट करियरची सुरुवात इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून केली होती. त्यानंतर रॉबिननं ४६ एकदिवसीय सामने खेळले, त्यात त्यानं ९३४ धावा केल्या होत्या. याशिवाय तो T20 स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जायचा. डावाच्या सुरुवातीला फटकेबाजी करण्याचं कसब त्याच्याकडे असल्यानं त्यानं अनेक वर्ष आयपीएलमध्ये केकेआर आणि नंतर सीएसकेकडून क्रिकेटचं मैदान गाजवलेलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग