Murlikant Petkar Arjuna Award : ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती मनु भाकर, विश्व बुद्धीबळ चॅम्पियन गुकेश डोमराजू, भारतीय पुरुष हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराअॅथलीट प्रवीण कुमार यांना आज (शुक्रवार) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ३२ खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड देण्यात आले. यामध्ये दोन जणांना लाइफटाइम कॅटेगरीत अर्जुन अवॉर्ड मिळाला.
लाइफटाइम कॅटेगरीमध्ये सुचा सिंह आणि मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार देण्य़ात आला. पॅरालिम्पिक स्वर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये भारतासाठी पहिलेपॅरालिम्पिकसुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, अर्जुन पुरस्कार मिळाल्याने मी खूप खुश आहे. हा एक असा सन्मान आहे, ज्याच मला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता व भारतीय लष्कराचा सदस्याच्या रुपात आपल्या कारकिर्दीत हवासा होता. हा पुरस्कार भारत सरकार, महाराष्ट्र राज्य, रोटरी क्लब आणि अन्य लोकांच्या समर्थनाचे प्रमाण आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि अपंगअॅथलिटांमध्ये आपली ओळख बनवायला मदत केली.
अर्जुन पुरस्कार स्वीकारण्याआधी महान मराठमोळे खेळाडू पेठकर यांनी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांचे आभार मानले. आमच्यासारख्या अपंगाला एवढा मान कोणी देत नाही. साजिद नाडियाडवाला यांच्यामुळे मला जगात लोकप्रियता मिळाली. जो मान मिळतोय तो चित्रपटामुळेच, असे मुरलीकांत पेटकर म्हणाले. माझ्या कथेवर विश्वास ठेवला अन् माझी कथा'चंदू चॅम्पियन'च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणली. यासाठी मी साजिद नाडियाडवाला यांचे मनापासून आभार मानतो. दिग्दर्शक कबीर खान आणि या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणाऱ्या कार्तिक आर्यनचेही मुरलीकांत पेटकर यांनी आभार मानले आहेत.
मुरलीकांत पेटकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लापूर येथे झाला होता. या जिगरबाज खेळाडूने आयुष्यातील कठोर अडथळ्यांची शर्यत पार करत पॅरालिम्पिकमध्ये स्विमिंग प्रकारात भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलंहोतं.मुरलीकांत पेटकर भारतीय लष्करात सैनिक होते. १९६५ च्या भारत-पाक युद्धात ते जखमी झाले होते. त्यांना ९ गोळ्या लागल्याने त्यांचा कंबरेच्या खालचा भाग लुळा पडला होता. अर्धांगवायू झाल्यानंतरही जबर इच्छाशक्तीच्या जोरावर या लढवय्यानं पॅरा गेम्समध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल जिंकले होते. १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी स्विमिंगमध्ये पहिलं सुवर्ण पदक पटकावले होते. 'चंदू चॅम्पियन' या बॉलिवूड चित्रपटातून या खेळाडूच्या संघर्षाची कहाणी दाखवली गेली अन् इतक्या वर्षे दुर्लक्षित राहिलेला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रकाश झोतात आला.
कार्तिक आर्यनने यक्त केली होती खुशी -
मुरलीकांत पेटकर यांना जेव्हा अर्जुन अवॉर्ड देण्याची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी अभिनेता कार्तिक आर्यन याने आनंद व्यक्त केला होता. त्याने म्हटले होते की, ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला आहे. त्यांच्याबायोपिकवर काम करताना त्यांच्या जीवनाबाबत मला इतक्या विस्ताराने व जवळून माहिती मिळाली की, त्याचे यश माझे व्यक्तगत असल्यासारखे वाटते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला आहे. नियतीने त्याच्या जीवनात अनेक आव्हाने उभी केली पण हा खेळाडू कधी डगमगला नाही. मी अनेक खेळाडूंना भेटलो आहे, मात्र मुरलीकांत सरांचे खेळातील कौशल्य आणि दृढ निश्चयाया तोडच नाही.
संबंधित बातम्या