भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्ती स्पर्धेतून (५० किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आले आहे. आता तिच्या अपात्रतेवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबीयांनी कुस्ती महासंघाेवर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
विनेश फोगटला सासरे राजपाल राठी यांनी सांगितले की, १०० ग्रॅम वजन असतेच किती. ते म्हणाले की, डोक्यावरील केसांमुळेही वजन १०० ग्रॅम वाढू शकते. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि बृजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचे ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राजपाल राठी म्हणाले, की "ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केले जात आहे. हे एक षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. १०० ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर होते? १०० ग्रॅम वजन डोक्यांवरील केसांमुळेही वाढू शकते."
ते पुढे म्हणाले, "मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. पण माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचे विनेशने वारंवार सांगितले आहे. फोगटने जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा हे विधान केले आहे. फोगटच्या अपात्रतेमुळे लोक संतप्त झाले आहेत. काल कुस्ती झाली तेव्हा वजन वाढलं नव्हतं का?" असाही सवाल त्यांनी केला.
तसेच, या निर्णयाच्या विरोधात त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. विनेश फोगटच्या अपात्रतेचे ते कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत.
विनेशने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्तीमध्ये अतिंम अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला होता. पण आता अचानक १४० कोटी भारतीयांच्या आशा भंगल्या आहेत. विनेशला तिचे ५० किलोपेक्षा कमी वजन नियंत्रित करता आले नाही, त्यामुळे तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे.
नियमानुसार, अपात्र ठरल्यानंतर कोणतीही कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणतेही पदक जिंकू शकणार नाही. याचा अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावे लागणार आहे. म्हणजेच फायनलमध्ये पोहोचूनही सुवर्णपदक विसरले, आता त्यांना रौप्य आणि कांस्यपदकही गमवावे लागणार आहे.