मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीय महिला हॉकी संघ बाहेर, क्वालिफायरमध्ये जपानने उडवला धुव्वा

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीय महिला हॉकी संघ बाहेर, क्वालिफायरमध्ये जपानने उडवला धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 19, 2024 08:37 PM IST

Paris Olympic Qualifiers Hockey : आज पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि जपान यांच्यात सामना खेळला गेला. यात भारताचा १-० असा पराभव झाला. यासह जपान पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. तर भारत बाहेर पडला आहे.

Olympic Qualifiers 2024 hockey
Olympic Qualifiers 2024 hockey (PTI)

भारतीय महिला हॉकी संघाचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची आपली शेवटची संधी गमावली. सेमी फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाकडे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची शेवटची संधी होती, पण त्यांनी ती गमावली.

रांची येथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्रता सामने खेळले जात आहेत. यातील टॉप तीन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. पण भारतीय संघ पराभूत झाल्याने ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. यानंतर आज तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि जपान यांच्यात सामना खेळला गेला. यात भारताचा १-० असा पराभव झाला. यासह जपान पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. तर भारत बाहेर पडला आहे.

भारतीय महिला हॉकी संघ २०१६ नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. टीम इंडियाला यापूर्वी सेमीफायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.जर्मनी, अमेरिका आणि जपान हे संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

गेल्या वेळी म्हणजेच, टोकियो ऑलिम्पिक २०२२ मध्ये भारताने संघाने चमकदार कामगिरी केली होती. भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, पण पदक जिंकण्यात त्यांना यश आले नाही. संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.

ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले

भारतीय महिला संघ १९८० नंतर २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळला. या दरम्यान भारतीय महिला संघ ८ ऑलिम्पिक खेळांचा भाग होऊ शकला नाही. पण २०१६ पासून संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

जपानसाठी उराताने केला गोल 

तत्पूर्वी, आजच्या सामन्यात जपानसाठी एकमेव गोल उराता काना हिने केला. उराताने पहिल्या सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यानंतर सामन्याचा पहिला क्वार्टर संपला आणि भारत ०-१ ने पिछाडीवर होता. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये परिस्थिती बदलली आणि भारताच्या लालरेमसामीने पेनल्टी कॉर्नर जिंकला, पण जपानच्या गोलकीपरने अप्रतिम सेव्ह करत भारताचा गोल होऊ दिला नाही. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि जपानने सामना १-० असा जिंकला.

WhatsApp channel