मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Schedule: वर्ल्डकप आधी टीम इंडिया खेळणार १४ दिवसांत ६ सामने; ‘असं’ आहे वेळापत्रक

Team India Schedule: वर्ल्डकप आधी टीम इंडिया खेळणार १४ दिवसांत ६ सामने; ‘असं’ आहे वेळापत्रक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 26, 2022 11:59 AM IST

india vs south africa schedule: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी १५ जणांचा संघही जाहीर केला आहे. मात्र, आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप झालेली नाही.

Team India
Team India

भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर पुढील महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत ३ वनडे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी १५ जणांचा संघही जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप झालेली नाही.

अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ब्रेक मिळाला आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत दीपक चहरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका-

पहिला T20I - २८ सप्टेंबर (त्रिवेंद्रम)

दुसरा T20I - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा T20I - ४ ऑक्टोबर (इंदूर)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-

पहिला वनडे- ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा वनडे- ९ ऑक्टोबर (रांची)

तिसरा वनडे- ११ ऑक्टोबर (दिल्ली)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

WhatsApp channel

संबंधित बातम्या