मराठी बातम्या  /  क्रीडा  /  तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू आजपासून मैदानात; क्रिकेट, फुटबॉलसह एकूण ८ स्पर्धांचं वेळापत्रक

तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू आजपासून मैदानात; क्रिकेट, फुटबॉलसह एकूण ८ स्पर्धांचं वेळापत्रक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 11, 2023 04:16 PM IST

Indian Sports Calendar in 2023: सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारत कोणकोणत्या स्पर्धेत सहभाग घेणार आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Lakshya Sen
Lakshya Sen

Indian Sports Calendar: सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा भारतीय खेळाडूंसाठी अगदी व्यस्त असणार आहे. आजपासून सुरु झालेल्या या आठवड्यात भारताचे खेळाडू अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती स्पर्धेत दम दाखवणार आहेत. या एकूण ८ स्पर्धेच्या वेळापत्रकावर नजर टाकुयात.

ट्रेंडिंग न्यूज

ऍथलेटिक्स

आशियाई खेळापूर्वी भारतीय ऍथलेटिक्स अमलान बोरगोहेन, किशोर कुमार जेना हे देशांतर्गत पुरुषांच्या ४x ४०० मीटर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा चंदीगड येथे दोन (१० सप्टेंबर- ११ सप्टेंबर २०२३) दिवस चालणार आहे.

बॅडमिंटन

चायना ओपन नंतर हाँगकाँग ओपन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा उद्यापासून म्हणजेच १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन हा पुरुष एकेरीत अव्वल भारतीय मानांकित असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे भारताच्या काही अव्वल खेळाडूंनी हाँगकाँग ओपन स्पर्धेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बास्केटबॉल

भारतीय बास्केटबॉल संघाने एसएबीए अंडर- १६ आशियाई चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत श्रीलंकेचा पराभव करत एफआयबीए अंडर- १६ मध्ये चॅम्पियनशिपमध्ये धडक दिली. ही स्पर्धा १७ सप्टेंबर- २४ सप्टेंबर २०२३ दरम्यान खेळली जाणार आहे.

क्रिकेट

आशिया चषकातील साखळी सामने संपले असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्या संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. या आठवड्यात भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याशी सामना खेळायचा आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (१७ सप्टेंबर २०२३) आशिया चषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात धडक देण्यासाठी भारताला सुपर ४ मध्ये तीन पैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.

फुटबॉल

भारतीय अंडर-23 पुरुष संघाने त्यांच्या पात्रता मोहिमेची सुरुवात यजमान चीनकडून (१-२) पराभवाने केली. मालदीवने माघार घेतल्याने भारत यूएई विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ चार दुसऱ्या क्रमांकाच्या संघासह कतारमधील अंतिम स्पर्धेत पोहोचतात.

शूटिंग

आयएसएसएफ शूटिंग विश्वचषक स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता सौरभ चौधरी सहभाग घेणार आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये स्थान गमावल्यानंतर सौरभ चौधरी चांगली कामगिरी करण्यासाठी आणि आगामी स्पर्धांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल. आयएसएसएफ शूटिंग विश्वचषक स्पर्धा १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबरदरम्यान खेळली जाणार आहे.

टेनिस

डेव्हिस चषक विश्व गट २ स्पर्धा लखनौ येथे १६ आणि १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचा सामना मोरोक्कोशी होणार आहे आणि विजेता जागतिक गट पात्रता स्टेज १ मध्ये पोहोचेल. रोहन बोपण्णा भारताकडून अंतिम सामना खेळणार आहे. एक दशकाहून अधिक काळ देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर रोहन बोपण्णा आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम लावणार आहे.

कुस्ती

आगामी ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप खेळणार आहेत. दरम्यान, १६ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत अंतीम पंघल आणि अमन शेरावत हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. २४ सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग