मराठी बातम्या  /  क्रीडा  /   सुनील छेत्रीच्या संघानं रचला इतिहास! 'या' महत्वाच्या स्पर्धेत एन्ट्री

सुनील छेत्रीच्या संघानं रचला इतिहास! 'या' महत्वाच्या स्पर्धेत एन्ट्री

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 14, 2022 02:57 PM IST

AFC आशियाई चषक हा २०२३ मध्ये खेळवला जाणार आहे.

team india
team india

भारतीय फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक स्पर्धेत प्रवेश केला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा पराक्रम केला आहे. AFC आशियाई चषक हा २०२३ मध्ये खेळवला जाणार आहे.

पॅलेस्टाईनने फिलीपिन्सला ४-० ने पराभूत केले. त्यानंतर भारताचा या स्पर्धेत प्रवेश निश्चित झाला आहे. भारताने याआधी पात्रता फेरीत अफगाणिस्तानचा २-१ ने पराभव केला, तर कंबोडियाविरुद्धही भारतीय संघाने २-० असा विजय विजय मिळवला होता.

भारताचा सामना आता मंगळवारी (१४ जून) ला हाँगकाँगसोबक होणार आहे. या सामन्यात भारत हॉंगकॉंकडून हारला तरी त्याचा पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

भारत पाचव्यांदा आशिया चषकात-

भारतीय संघाने एकूण पाचव्यांदा या एएफसी आशियाई चषत स्पर्धेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने १९६४, १९८४, २०११ आणि २०१९ च्या स्पर्धाही खेळल्या आहेत.

मेस्सीशी बरोबरी साधण्यावर सुनिल छेत्रीची नजर-

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध एक गोल केल्यानंतर भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचे १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८३ गोल झाले आहेत. सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे दोघेच छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने १८९ सामन्यांमध्ये ११७ गोल केले आहेत तर मेस्सीने १६२ सामन्यांत ८६ गोल केले आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीची नजर मेस्सीच्या जवळ पोहोचण्यावर असणार आहे.

WhatsApp channel

विभाग