Cricket Records: भारतीय क्रिकेटपटूंचे ‘हे’ रेकॉर्ड्स मोडता येणं अशक्य; पाहा!
Indian Cricket Records: भारताने पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९३२ मध्ये खेळला. तेव्हापासून हजारो खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून या खेळाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनले आहेत. जे भारतीय खेळाडूंनी बनवले आहेत आणि मोडले देखील आहेत.
"विक्रम हे मोडण्यासाठीच असतात" अशी म्हण आहे. यातूनच प्रेरणा घेत अनेक क्रिकेटपटूंनी अनेक विक्रम बनवले आणि मोडलेही आहेत. पण क्रिकेटमध्ये असेही काही विक्रम आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य आहे. विशेष म्हणजे यातील काही विक्रम हे भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
भारताने पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९३२ मध्ये खेळला. तेव्हापासून हजारो खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून या खेळाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनले आहेत. जे भारतीय खेळाडूंनी बनवले आहेत आणि मोडले देखील आहेत.
सर्वाधिक स्टंपिंग- एम एस धोनी
महेंद्रसिंग धोनी हा भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार, फिनिशर आणि यष्टिरक्षकांपैकी एक आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम केले. यापैकी एक म्हणजे तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. धोनीने १५ वर्षांच्या कारकिर्दीत १९५ स्टंपिंग केल्या आहेत. हा विक्रम मोडणे खूप कठिण आहे. माहीच्या नावावर कसोटीत ३८, एकदिवसीय सामन्यात १२३ आणि T20 मध्ये ३४ स्टंपिंग आहेत. सध्या तरी दुसरा कोणताही यष्टिरक्षक धोनीच्या जवळपास देखील नाही. श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा तीन्ही फॉरमॅटमध्ये १३९ स्टंपिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सचिन तेंडुलकरची १०० शतकं-
'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने २४ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो धावा केल्या आहेत. त्याने अनेक बनवले आहेत आणि मोडलेली आहेत. तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०० शतके आहेत. कसोटीत सचिनने ५१ तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. त्याच्या जवळ सध्या कोणीही नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ७१ शतकांसह दुसऱ्या तर भारताचा विराट कोहली ७० शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक सलामीवीर मानला जातो. ३५ वर्षीय या सलामीवीराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे. रोहितने ८ वर्षांपूर्वी वनडेमध्ये श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूत केलेल्या २६४ धावा ठोकल्या होत्या. या दरम्यान त्याने ३३ चौकार आणि ९ षटकारांचा पाऊस पाडला होता.
राहुल द्रविड- सर्वाधिक चेंडूंचा सामना
राहुल द्रविड हा जगातील सर्वात उत्कृष्ट आणि विश्वासू कसोटी फलंदाज आहे. 'द वॉल' म्हणून क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या द्रविडने सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आहे. त्याने १६ वर्षांच्या आपल्या शानदार कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवला आहे.आपल्या १६४ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ३१, २५८ चेंडूंचा सामना करणारा द्रविड एकमेव खेळाडू आहे. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर २९,४३७ चेंडू खेळले आहे. द्रविडने कसोटी सामन्यांमध्ये ४४,१५२मिनिटे अर्थात जवळपास ७३६ तास क्रीजवर घालवले आहेत, हा देखील एक विश्वविक्रम आहे.
तिन्ही ICC ट्रॉफी जिंकणारा कर्णधार
महेंद्रसिंह धोनीच्या नावावर कर्णधार म्हणून अनेक विक्रम आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० वर्ल्ड कप, २०१० आशिया कप, २०११ वनडे वर्ल्ड कप, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१६ आशिया कप यांसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नावावर तीन्ही आयसीसी ट्रॉफी आहेत. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारतासाठी ICC T20 विश्वचषक, ICC एकदिवसीय विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
बापू नाडकर्णी- २१ षटके सलग निर्धाव तसेच, सर्वश्रेष्ठ इकॉनमी रेट
बापू नाडकर्णीच्या नावावर सर्वात कंजूष गोलंदाज असल्याचा विक्रम आहे. नाडकर्णींनी १२ जानेवारी १९६४ रोजी मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध सलग २१ षटके निर्धाव टाकली. त्यांनी ३२ षटकात केवळ ५ धावा दिल्या. पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही. (३२-२७-५-०) त्यांनी त्या डावात ०.१५ च्या इकॉनमी रेटने धावा दिल्या. हा विक्रमही मोडला जाणे जवळपास अशक्य आहे.