मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टीम इंडियाचा 'हा' खेळाडू करतोय चेतेश्वर पुजाराची कॉपी, लवकरच इंग्लंडला जाणार

टीम इंडियाचा 'हा' खेळाडू करतोय चेतेश्वर पुजाराची कॉपी, लवकरच इंग्लंडला जाणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 22, 2022 06:05 PM IST

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) प्रथमच इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे. सुंदर हाताच्या दुखापतीतून सावरत आहे.

Washington Sundar
Washington Sundar

भारताचा युवा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. मात्र, तो आता दुखापतीतून पूर्णपणे सावरत आहे. यानंतर वॉशिंग्टन सुंदर हा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो काऊंटी संघ लँकेशायरकडून खेळणार आहे. लँकेशायरने बुधवारी ही घोषणा केली आहे.

वॉशिंग्टन सुंदर प्रथमच इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे. सुंदर हाताच्या दुखापतीतून सावरत आहे. बीसीसीआयच्या एका सत्राने सांगितले आहे की, “वॉशिंग्टन पूर्ण बरे होण्याच्या जवळ आहे. त्याला लयीत येण्यासाठी मैदानात वेळ घालवावा लागणार आहे. तसेच सुंदर लँकेशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळायला जात आहे. यामुळे त्याच्या खेळात आणखी सुधारणा होणार आहे.”

सुंदरने विविध फॉरमॅटमध्ये आतापर्यंत समाधान कारक कामगिरी केली आहे. याबाबतीत लँकेशायरने सांगितले की, "वॉशिंग्टन सुंदर हा रॉयल लंडन वन-डे क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर फिटनेसच्या आधारे तो जुलैमध्ये काउंटी चॅम्पियनशिपही खेळू शकतो".

यानंतर वॉशिंग्टन सुंदरने लँकेशायर क्रिकेटला सांगितले आहे की, "लँकेशायर क्रिकेटसोबत प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळताना मी खूप उत्साहीत आहे. इंग्लंडच्या वातावरणात खेळणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव असेल. तसेच ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळण्यासाठी उत्साहीत आहे. मला ही संधी देण्यासाठी मी लँकेशायर क्रिकेट आणि बीसीसीआय या दोघांचे आभार मानू इच्छितो आणि पुढील महिन्यात संघात सामील होण्यास उत्सुक आहे.”

WhatsApp channel

संबंधित बातम्या