मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Breaking : कर्णधार Rohit Sharma कोरोना पॉझिटिव्ह; सराव सामन्यातून बाहेर
Rohit sharma corona positive
Rohit sharma corona positive (HT)
26 June 2022, 8:23 ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 8:23 IST
  • Rohit sharma corona positive : विराट कोहली आणि आर आश्विन नंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे.

Rohit sharma latest news : दक्षिण आफ्रिकेसोबतची मालिक संपल्यानंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये १ जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्याआधीच टिम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची रॅपिड अँटीजेन चाचणी केली असता त्यात तो पॉझिटिव्ह आला असून त्याला सराव सामन्यातूनही वगळण्यात आलं आहे. यासंदर्भातली माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टिम इंडिया आणि लीसेस्टरशायरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ४ दिवसीय सराव सामन्यात रोहित शर्मा खेळत होता. त्यानं पहिल्या डावात फलंदाजी देखील केली. मात्र दुसऱ्या डावाआधी त्याला कोरोनाची लागण झाल्यानं तो खेळू शकला नाही. त्यामुळं भारतीय संघाकडून युवा फलंदाज केएस भरतला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आलं. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार रोहितला सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.

आश्विन आणि विराटही झाले होते कोरोना पॉझिटिव्ह...

इंग्लंडविरुजद्धच्या मालिकेसाठी १६ जूनला भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला होता. परंतु त्यावेळी टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कोरोनाची लागण झाल्यामुळं टीमसोबत गेला नाही. याशिवाय गेल्या आठवड्यात लंडनला पोहचलेला धडाकेबाज फलंदाज आणि माजी भारतीय कर्णधार विराट कोहली यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु या दोन्ही खेळाडूंनी कोरोनावर मात केली असून ते आता टिमसोबत आहेत.

विराट कोहलीनंतर आजच्या घडीला रोहित शर्मा हाच तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतके झळकावली आहेत. रोहित शर्माच्या फलंदाजीत खरा बदल हा सलामीवीर बनल्यानंतर झाला, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.