मराठी बातम्या  /  क्रीडा  /  वाह! करिअर असावं तर Rohit Sharma सारखं, १५ वर्षांपूर्वी झाला होता हिटमॅनचा उदय
rohit sharma
rohit sharma
23 June 2022, 9:00 AM ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 9:00 AM IST
  • विराट कोहलीनंतर (virat kohli) आजच्या घडीला रोहित शर्मा (rohit sharma) हाच तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा (team india) सर्वोत्तम फलंदाज आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा (team india) कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit sharma) २३ जून हा दिवस खूप खास आहे. रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली होती. ३५ वर्षीय रोहितने १५ वर्षांपूर्वी याच दिवशी आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

आज १५ वर्षांनंतर रोहित शर्माने तिन्ही क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज त्याने टीम इंडियासोबतच्या १५ वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. यावेळी रोहित शर्माने या खडतर प्रवासात ज्यांनी त्याची साथ दिली त्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत.

रोहितने एक अतिशय खास नोट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केली आहेत. १५ वर्षांपूर्वी याच दिवशी मी भारतासाठी पदार्पण केले होते. आतापर्यंतचा हा प्रवास खूप छान झाला आहे. हा एक असा प्रवास आहे, ज्याचा आनंद मी आयुष्यभर घेत राहिन".

रोहित शर्माने नोटमध्ये पुढे लिहिले की, “आज मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो, जे या प्रवासात माझ्यासोबत आहेत. मी त्या लोकांचा सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला आज या स्तरापर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे".

सोबतच, “क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे प्रेम आणि त्यांचा पाठिंबा हाच आम्हाला संघाला पुढे घेऊन जाण्यात मदत करत असतो", असेही रोहितने म्हटले आहे.

विराटनंतर रोहित शर्मा हाच सर्वोत्तम खेळाडू-

विराट कोहलीनंतर आजच्या घडीला रोहित शर्मा हाच तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतके झळकावली आहेत. रोहित शर्माच्या फलंदाजीत खरा बदल हा सलामीवीर बनल्यानंतर झाला, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

रोहित शर्माचे करिअर-

रोहित शर्माने आतापर्यंत ४५ कसोटी, २३० एकदिवसीय आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ९ हजार २८३, कसोटीत ३ हजार १३७ तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ हजार ३१३ धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटीत ८, एकदिवसीय सामन्यांमध्ये २९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ शतके आहेत.