बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी. गुकेश याने आपल्या बुद्धिबळ चालींनी अनेकांना थक्क केले आहे. अलीकडेच डी गुकेशच्या संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. हे भारताचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक होते.
तथापि, ग्रँडमास्टर डी. गुकेश याचा एक समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गुकेश हा रजनीकांतच्या लेटेस्ट चित्रपटातील गाणे मानसीलायो यावर डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडीओत डी गुकेशसोबत इतक काही लोकही दिसत आहेत. सर्वजण पारंपारिक कपडे परिधान करून मनासिलायो या गाण्याच्या स्टेप्स करत आहेत. गुकेशचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला असून या व्हिडीओवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.
व्हिडीओमध्ये डीकेश लाल रंगाचा कुर्ता लुंगी आणि सनग्लासेस परिधान करून मस्त नाचताना दिसत आहे.
डी गुकेशने एप्रिलमध्ये कँडीडेट्स स्पर्धा जिंकली होती. तो वयाच्या १७ व्या वर्षी जागतिक जेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. मे महिन्यात तो १८ वर्षांचा झाला.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये डी गुकेश आणि संघाने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ च्या खुल्या विभागात भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक होते. हंगेरीतील बुडापेस्ट येथे रविवारी (२२ सप्टेंबर) भारताने ही शानदार कामगिरी केली.
भारतीय पुरुष संघात गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन इरिगाईसी, विदित गुजराती, पंतला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन (कर्णधार) यांचा समावेश होता.
यापूर्वी भारताने २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. ही स्पर्धा मायदेशातच आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी २०१४ मध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते.