मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Divya Deshmukh : माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींचीच चर्चा; बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिचा प्रेक्षकांच्या वर्तनावर आक्षेप

Divya Deshmukh : माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींचीच चर्चा; बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिचा प्रेक्षकांच्या वर्तनावर आक्षेप

Jan 30, 2024 07:03 PM IST

Divya Deshmukh Chess : दिव्या देशमुखने सांगितले, की स्पर्धेतील आपल्या कामगिरी आणि खेळापेक्षा तेथील लोकांचे लक्ष माझ्या कपड्यांकडे, केसांकडे आणि मी कशी बोलते, त्या उच्चारांकडे अधिक होते.

Indian Chess Player Divya Deshmukh
Indian Chess Player Divya Deshmukh

Divya Deshmukh Chess : भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ही नुकतीच नेदरलँड्समधील एका स्पर्धेत सहभागी झाली होती. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन भारतात परतल्यानंतर दिव्याने काही गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहून नेदरलँड्समधील प्रेक्षकांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे दिव्याने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

१८ वर्षाची दिव्या नागपूरची असून ती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. मागच्यावर्षी आशियाई महिला चेस चॅम्पियनशिपचा किताब तिने जिंकला होता. पण या स्पर्धेत तिने १३ पैकी ४.५ गुणांसह १२ वे स्थान मिळविले.

माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींचीच जास्त चर्चा झाली

दिव्या देशमुखने सांगितले, की स्पर्धेतील आपल्या कामगिरी आणि खेळापेक्षा तेथील लोकांचे लक्ष माझ्या कपड्यांकडे, केसांकडे आणि मी कशी बोलते, त्या उच्चारांकडे अधिक होते. मला याविषयी बोलायचे होते, पण मी माझी टूर्नामेंट संपण्याची वाट पाहत होते. मला हे आधीच सांगितले गेले होते आणि मी स्वतः देखील अनुभवले की बुद्धिबळातील महिलांना प्रेक्षक कसे गृहित धरतात. हे पाहून मला खरोखरच वाईट वाटले.

सोबतच दिव्या पुढे म्हणाली, 'मी फक्त १८ वर्षांची आहे आणि मला अशा गोष्टींचा सामना करावा लागला, पुरूषांच्या स्पर्धेत असे होत नाही. माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींचीच खूप चर्चा झाली. याचे मला खूप वाईट वाटते. हा एक प्रकारचा अन्याय आहे. मला वाटते की स्त्रियांचे कमी कौतुक केले जाते, आणि इतर कमी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते.'

 

 

WhatsApp channel
विभाग