मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘तुमसे ना हो पायेगा!’ पंतच्या नावे लाजिरवाणा विक्रम, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

‘तुमसे ना हो पायेगा!’ पंतच्या नावे लाजिरवाणा विक्रम, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 19, 2022 10:16 PM IST

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरीत आहेत.

rishabh pant
rishabh pant

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात रिषभ पंतने नाणेफेक गमावला. यानंतर पंतच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. द्विपक्षीय मालिकेत पाच किंवा अधिक नाणेफेक गमावणारा पंत जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त टेम्बा बावुमाच्या जागी तो संघाचे नेतृत्व करत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या मालिकेत रिषभ पंतने सर्वच सामन्यात नाणेफेक गमावले आहे. पंतने नाणेफेक गमावल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे. यावेळी नेटकऱ्यांना पंतसोबत विराट कोहलीचीही आठवण झाली. काही नेटकऱ्यांनी तर पंतला विराट २.0 म्हटले आहे. याशिवाय इतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरीत आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले. यानंतर भारताने मालिकेत शानदार प्रदर्शन करत तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० मध्ये विजय मिळवला.

WhatsApp channel