PV Sindhu Husband Name and Photo : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतीच ती टीम इंडियाचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या घरी पोहोचली. सिंधूने सचिनला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. सिंधूसोबत तिचा होणारा पती व्यंकट दत्ता साई हाही पोहोचला होता.
यानंतर सचिनने सिंधूला शुभेच्छा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात एक फोटोही जोडला आहे.
भारताची फुलराणी पीव्ही सिंधू २२ डिसेंबरला लग्न करणार आहे. ती सचिनला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आली होती. सचिनने X वर एक फोटो शेअर केला आहे.
कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "बॅडमिंटनमध्ये स्कोअर नेहमी 'प्रेम' ने सुरू होतो. तुझ्या खास दिवसाचा एक भाग होण्यासाठी आम्हाला वैयक्तिकरित्या आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा दोघांनाही आयुष्यभर अप्रतिम आठवणी आणि आनंद मिळो.
सिंधू भारताची स्टार खेळाडू आहे. तिच्या कुटुंबीयांनी नुकतेच लग्नाला दुजोरा दिला होता. सिंधूच्या सामन्यांचे वेळापत्रक लक्षात घेता त्यात काही बदल होऊ शकतात. सध्या लग्नाची तारीख २२ डिसेंबर आहे. यानंतर २४ डिसेंबर रोजी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधूचे लग्न हैदराबादमध्ये होणार आहे. तिचा होणारा पती व्यंकट दत्त साई एका कंपनीत कार्यकारी संचालक आहे.
संबंधित बातम्या