मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma : रोहित शर्मानं केली कमाल, 'या' मोठ्या विक्रमात डिव्हिलियर्सला मागे टाकलं

Rohit Sharma : रोहित शर्मानं केली कमाल, 'या' मोठ्या विक्रमात डिव्हिलियर्सला मागे टाकलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2023 03:17 PM IST

Rohit Sharma Odi runs : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत, तो आता अव्वल खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. रोहित वेगाने १० हजार धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

india vs sri lanka 3rd odi : भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून येथे कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता १० हजार धावांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १७व्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९५७७ धावांचा आकडा पार केला आहे आणि तो आता वेगाने पुढे जात आहे.

रोहित शर्मा या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही. चांगली सुरुवात करुनही तो केवळ ४२ धावांवर बाद झाला. या खेळीत रोहित शर्माने ४९ चेंडू खेळले, ज्यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. या वनडे मालिकेतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा रोहित शर्माने एका चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावली आहे.

सध्या सक्रिय क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समाविष्ट असलेले बहुतांश फलंदाज निवृत्त झाले आहेत. फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा हेच खेळाडू आहेत जे टॉप-२० मध्ये सक्रिय खेळाडू आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१. सचिन तेंडुलकर - ४६३ सामने, १८४२६ धावा

२. कुमार संगकारा - ४०४ सामने, १४२३४ धावा

३. रिकी पाँटिंग - ३७५ सामने, १३७०४ धावा

४. सनथ जयसूर्या - ४४५ सामने, १३४३० धावा

५. महेला जयवर्धने - ४४८ सामने, १२६५० धावा

६. विराट कोहली - २६८ सामने, १२५८८ धावा*

७. इंझमाम-उल-हक - ३७८ सामने, ११७३९ धावा

८. जॅक कॅलिस - ३२८ सामने, ११५७९ धावा

९. सौरव गांगुली - ३११ सामने, ११३६३ धावा

१०. राहुल द्रविड - ३४४ सामने, १०८८९ धावा

WhatsApp channel