मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 1st T20 : सुर्याच नाही… तर ‘हे’ ५ खेळाडू टी-20 मालिका गाजवणार, जाणून घ्या

IND vs NZ 1st T20 : सुर्याच नाही… तर ‘हे’ ५ खेळाडू टी-20 मालिका गाजवणार, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 05:48 PM IST

India vs New Zealand t20 series : वनडेनंतर आता टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना आज (२७ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून रांचीमध्ये खेळवला जाईल.

IND vs NZ 1st T20
IND vs NZ 1st T20

India vs New Zealand 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील T20 मालिकेला आज (२७ जानेवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने याआधीच न्यूझीलंडचा वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. तसेच, न्यूझीलंडचा संघ गेल्या ११ वर्षांपासून भारतात टी-20 मालिका जिंकू शकलेला नाही. अशा स्थितीत किवींविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा दबदबा कायम राहणार, अशी शक्यता आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. या दिग्गजांच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि उमरान मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

शुभमन गिल

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यांमध्ये सर्वाधिक ३६० धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात द्विशतक आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. टी-20 मध्येही गिल हा फॉर्म कायम ठेवू इच्छितो.

सुर्यकुमार यादव

टी-20 चा नंबर-वन फलंदाज सूर्यकुमार यादव मधल्या फळीत येईल. सूर्याला एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र टी-20मध्ये त्याचे नाणे खणखणीत वाजते. त्याने या वर्षाची सुरुवात शतकाने केली. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतक झळकावले होते. अशा स्थितीत तो आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास पूर्णपणे तयार दिसत आहे.

हार्दिक पंड्या

भारतीय T20 संघाचे कर्णधार अष्टपैलू हार्दिक पंड्याही चांगली कामगिरी करण्या, सज्ज आहे. पंड्या मधल्या फळीत फलंदाजी मजबूत करेल. पांड्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एक अर्धशतक आणि एकूण ४ बळी घेतले होते.

कुलदीप आणि उमरान

अनुभवी चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्यावर भारतीय चाहत्यांची नजर असेल. उमरानमध्ये १५० च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तर कुलदीपने गेल्या १० सामन्यांमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. टी-२० मालिकेतही या दोघांकडून खूप अपेक्षा असतील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या