मराठी बातम्या  /  क्रीडा  /  आधी शुन्यावर त्रिफळ उडवला, अन् नंतर...शमी-पुजाराचा व्हिडीओ व्हायरल
mohammad shami
mohammad shami
24 June 2022, 19:30 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 19:30 IST
  • लिसेस्टरशायरने दुसऱ्या सत्रापर्यंत ६ बाद २०४ धावा केल्या आहेत. रिषभ पंत ७२ धावांवर तर रोमन वॉकर २५ धावांवर खेळत आहेत. लिसेस्टरशायरचा संघ आणखीन ४२ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघ लीसेस्टरशायरविरुद्ध (india vs leicestershire) चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. भारताने पहिल्या दिवशी ८ बाद २४६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आहेत त्याच धावसंख्येवर डाव घोषित केला.

ट्रेंडिंग न्यूज

या सराव सामन्यात भारताचे चार खेळाडू लीसेस्टरशायर संघाकडून खेळत आहेत. यात चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंना सरावाची जास्तीत जास्त संधी मिळावी, त्यामुळे या खेळाडूंना दुसऱ्या संघाकडून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असूनही पुजारा फलंदाजीत फार काही करू शकला नाही.

लीसेस्टरशायरकडून खेळताना पुजारा शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. पुजाराने बाद होण्यापूर्वी सहा चेंडू खेळले. पुजाराला बाद केल्यानंतर शमीने जल्लोष केला. शमाने पुजाराच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पुजाराला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुजाराला वगळण्यात आले होते. पुजाराने काऊंटीमध्ये दोन द्विशतके झळकावली आहेत.

लिसेस्टरशायरने दुसऱ्या सत्रापर्यंत ६ बाद २०४ धावा केल्या आहेत. रिषभ पंत ७२ धावांवर तर रोमन वॉकर २५ धावांवर खेळत आहेत. लिसेस्टरशायरचा संघ आणखीन ४२ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी, केएस भरतच्या नाबाद ७० धावांच्या जोरावर भारताने ८ बाद २४६ धावा केल्या. भरतशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. कोहली ३३, रोहित शर्मा २५ आणि शुभमन गिल २१ धावा करून बाद झाले. श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही. रवींद्र जडेजा 13 आणि हनुमा विहारी तीन धावा करून बाद झाला.