मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भावा संजूचीच हवा! फक्त १४ सामने खेळलेल्या सॅमसनची आयर्लंडमध्ये वेगळीच क्रेझ

भावा संजूचीच हवा! फक्त १४ सामने खेळलेल्या सॅमसनची आयर्लंडमध्ये वेगळीच क्रेझ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 29, 2022 06:23 PM IST

या सामन्यात संजूने टी-२० मधील आपले पहिले अर्धशतक झळकावताना ४२ चेंडूत ७७ धाववा चोपल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तसेच, दीपक हुड्डाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. हुड्डाने ९ चौकार आणि ६ षटकारांच्या साह्याने ५७ चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

sanju smason
sanju smason

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली टी-२० मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने (india vs ireland) मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघानेही २२१ धावांपर्यंत मजल मारली.

विशेष म्हणजे, या मालिकेदरम्यान संजू सॅमसनची आयर्लंडमधील जबरदस्त फॅन फॉलोविंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. संजूला पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यात संजूला संघात घेण्यात आले. सामना सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसन जेव्हा सरावासाठी मैदानात आला तेव्हा संजू, संजू, अशा घोषणांनी स्टेडियम दूमदूमून गेले होते. याचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यावरुन संजूच्या फॅन फॉलोविंगचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

या व्हिडीओत काही चाहत्यांनी संजूला ऑटोग्राफ आणि सेल्फी घेण्यास आग्रह केल्याचे दिसत आहे. त्यानंतर संजूही चाहत्यांजवळ पोहोचला आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी संजू सॅमसनच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच स्मितहास्य होते. तसेच, त्याने चाहत्यांमध्ये बराच वेळ घालवल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरम्यान, असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या टी-२० सामन्या दरम्यानचा आहे. सामन्यापूर्वी जेव्हा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून संजू सॅमसन हा प्लेइंग ११ मध्ये असल्याची माहिती दिली. तेव्हा संजूचे नाव ऐकताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी हे पाहून कर्णधार हार्दिक पांड्याही अवाक झाला. सोबतच म्हणाला की, माझा निर्णय सर्वांना आवडलेला दिसतोय."

भारताचा धावांचा डोंगर-

संजू सॅमसनने १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यात संजूने टी-२० मधील आपले पहिले अर्धशतक झळकावताना ४२ चेंडूत ७७ धाववा चोपल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.  तसेच, दीपक हुड्डाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. हुड्डाने ९ चौकार आणि ६ षटकारांच्या साह्याने ५७ चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १७६ धावांची भागिदारी रचली. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या दोघांच्या बळावर भारताने २० षटकात २२५ धावा केल्या होत्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या