मराठी बातम्या  /  क्रीडा  /  मयंकचा संघात समावेश, रोहित शर्माबाबत BCCI सचिव जय शाह म्हणाले…

मयंकचा संघात समावेश, रोहित शर्माबाबत BCCI सचिव जय शाह म्हणाले…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 27, 2022 07:29 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (england vs india) सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (rohit sharma) कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत त्याचा पर्याय म्हणून मयंक अग्रवालला (mayank agarwal) इंग्लंडमध्ये बोलवण्यात आले आहे.

mayank agarwal
mayank agarwal

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मयंक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्यामुळे तो १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणारा कसोटी सामना खेळू शकेल की नाही यावर सस्पेंस कायम आहे. मात्र, मयंक अग्रवाल बर्मिंगहॅम कसोटी सामन्यापूर्वी संघात सामील होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

मात्र, बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, हे भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलेले नाही.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोहित शर्मा हाच संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत दुसरा कोणीतरी संघाचा कर्णधार होऊ शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पहिली कसोटी सुरू होण्याला आणखी वेळ आहे. जर रोहित सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला तर तो सामना खेळेल आणि कर्णधारपदही भूषवताना दिसेल.

या सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध होणार की नाही, यावर सस्पेन्स कायम आहे. टीम इंडियाकडून कर्णधारपदाबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सराव सामन्यादरम्यान, जेव्हा रोहित कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला होता तेव्हा, संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहने केले होते. जर रोहित हा सामना खेळू शकला नाही तर बुमराह संघाची कमान सांभाळेल, असेही मानले जात आहे. सोबतच, विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्या नावाचीही चर्चा आहे.

जर रोहित शर्मा उपलब्ध नसेल तर मयंक अग्रवाल शुभमन गिलसह डावाची सुरुवात करताना दिसेल. रोहितचा RTPCR रिपोर्ट उद्या येणार आहे. तो १ जुलैपासून होणारा कसोटी सामना खेळू शकेल की नाही हे उद्यापर्यं ठरणार आहे.

कोरोनामुळेच सामना पुढे ढकलण्यात आला होता-

१ जुलैपासून होणारा कसोटी सामना हा यापूर्वी २०२१ मध्ये होणार होता, परंतु त्यावेळी इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. जर इतर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

WhatsApp channel