मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ब्रॉडच्या ओव्हरमध्ये ३५ धावा, बुमराहच्या बॅटिंगनंतर सचिनच्या ट्वीटची चर्चा

ब्रॉडच्या ओव्हरमध्ये ३५ धावा, बुमराहच्या बॅटिंगनंतर सचिनच्या ट्वीटची चर्चा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 07:14 PM IST

आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले.

bumrah
bumrah

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एजबॅस्टनच्या मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे.

त्यापूर्वी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शेवटच्या विकेटसाठी आक्रमक भागीदारी रचली. या दरम्यान बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा चोपल्या. ८४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने बुमराह आणि सिराजला घाबरवण्यासाठी बाऊन्सर टाकले. मात्र, ब्रॉडचा हा प्रयत्न कर्णधार बुमराहने हाणून पाडला. बुमराहने या षटकात ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर एका वाईड चेंडूवर ५ धावा मिळाल्या. त्याची ही फटकेबाजी पाहून चाहत्यांना युवराज सिंगची आठवण झाली. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते.

यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानेही ट्वीट करुन बुमराहचे कौतुक केले आहे. 'हा युवी आहे की बुमराह!? २००७ ची आठवण करून देती..' असे ट्वीट सचिनने केले आहे.

कर्णधार जसप्रीत बुमराहने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. भारताडून मोहम्मद सिराज हा बाद होणारा शेवटचा फलंंदाज ठरला. तो २ धावांवर बाद झाला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे. पहिल्या दिवशी ८३ धावांवर नाबाद असलेल्या रविंद्र जडेजाने आज आपल्या कारकिर्दितले तिसरे शतक झळकावले. जडेजा १०४ धावांवर बाद झाला. त्याने १९४ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार खेचले. त्याला जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड केले. भारताने दुसऱ्या दिवशी एकूण ७८ धावा जोडल्या. याआधी भारतासाठी पंतने १४६ धावांची तुफानी खेळी खेळताना कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले होते.

WhatsApp channel