मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बुमराहच्या बॅटिंगवर चंद्रकांतदादांचे ट्वीट, नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

बुमराहच्या बॅटिंगवर चंद्रकांतदादांचे ट्वीट, नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 08:01 PM IST

एजबॅस्टन कसोटीत जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा केल्या. याविषयीचे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

jaspreet bumrah and chandrakant patil
jaspreet bumrah and chandrakant patil

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना इच्छा नसताना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे लागले आहे. या अशा अनेक घटना घडत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र क्रिकेटचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

एजबॅस्टन कसोटीत जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा केल्या. याविषयीचे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यानंतर त्यांच्या ट्वीटवर अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी जसप्रीत बुमराहच्या कौतुकाचे ट्वीट केले आहे.

 

सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शेवटच्या विकेटसाठी आक्रमक भागीदारी रचली. या दरम्यान बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा चोपल्या. ८४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने बुमराह आणि सिराजला घाबरवण्यासाठी बाऊन्सर टाकले. मात्र, ब्रॉडचा हा प्रयत्न कर्णधार बुमराहने हाणून पाडला. बुमराहने या षटकात ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर एका वाईड चेंडूवर ५ धावा मिळाल्या. त्याची ही फटकेबाजी पाहून चाहत्यांना युवराज सिंगची आठवण झाली. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते.

कर्णधार जसप्रीत बुमराहने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. भारताडून मोहम्मद सिराज हा बाद होणारा शेवटचा फलंंदाज ठरला. तो २ धावांवर बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे.

 

WhatsApp channel