मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shardul Thakur: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ कारणामुळं शार्दुल ठाकूर संघाबाहेर

Shardul Thakur: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ कारणामुळं शार्दुल ठाकूर संघाबाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 06, 2022 03:04 PM IST

Shardul Thakur, Ind Vs Ban 2nd ODI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (७ डिसेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपल्या प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकते. कारण शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Shardul Thakur
Shardul Thakur

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (७ डिसेंबर) होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत १-० ने पिछाडीवर असून आता पुनरागमन करण्याकडे लक्ष आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे, कारण शार्दुल ठाकूरच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकूरला गोलंदाजी करताना खूप त्रास होत होता. त्याला क्रॅम्प्स येत होते. अशा परिस्थितीत तो दुसऱ्या वनडेत खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. कारण वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकाही होणार आहे, अशा स्थितीत संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

यामुळेच शार्दुल ठाकूरला दुसऱ्या वनडेत विश्रांती मिळू शकते, असे झाल्यास भारताला प्लेइंग-११ मध्ये बदल करावा लागेल. अशा परिस्थितीत जम्मूचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला खेळण्याची संधी मिळू शकते.

उमरान मलिकने टीम इंडियासाठी आतापर्यंत २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने फक्त ३ विकेट घेतले आहेत. उमरानने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून पदार्पण केले होते.

पहिल्या वनडेबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने प्रत्येक क्षेत्रात खराब कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ १८६ धावा केल्या, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी थोडी मेहनत केली आणि बांगलादेशच्या ९ विकेट घेतल्या. पण गोलंदाजांना शेवटची विकेट घेता आली नाही आणि अखेर बांगलादेशने हा सामना एका विकेटने जिंकला.

दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-११:

 रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल / वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, उमरान मलिक, कुलदीप सेन, दीपक चहर, मोहम्मद सिराज

WhatsApp channel